
जळगाव प्रतिनिधी
राज्यात इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून 98 टक्के निकालासह विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. यंदा कोकणानं यंदा निकालात अव्वल स्थान आहे, पेढे वाटून, केक कापून आणि कुटुंबीयांसोबत गोडधोड आठवणी जपत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपला आनंद साजरा केला.
सोशल मीडियातूनही 12 वीच्या परीक्षेच्या निकालासंदर्भाने जनजागृती केली जात आहे. विद्यार्थ्यांनी अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्यास खचू नये, पुन्हा जोमाने तयारी करावी किंवा आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे असा संदेश दिला जात आहे. मात्र, 12 वीच्या बोर्ड परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. तर, यवतमाळमध्येही नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याने जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज लागला. या निकालात अपेक्षेपेक्षा मार्क कमी मिळाल्याने जळगाव जिल्ह्यातील ममूराबाद गावातील ऋषिकेश दिनेशचंद्र पाटील या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे यवतमाळमध्ये नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं.
काल झालेल्या नीट परीक्षेचा पेपर बरोबर न गेल्याने नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना यवतमाळच्या दिग्रस येथे घडली. लकी सुनील चव्हाण (19) असं आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव. पेपर कठीण असल्याने आपण अपेक्षित निकाल देऊ शकत नसल्याच्या भीतीने ही आत्महत्या केली आहे. मृत लकी चव्हाण याने नांदेड येथे कोचिंग क्लासेस करून नीट परीक्षेची तयारी केली होती. मृत लकी चव्हाण यांचे काका मंगल चव्हाण यांनी, काल झालेल्या पेपर ठीक न गेल्याने तो नाराज होता,असे दिग्रस पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. लकीचे वडील सुनिल नुरसिंग चव्हाण शिक्षक असून फुलउमरी ता. मनोरा जिल्हा वाशिम येथे कार्यरत आहे. नीटचा पेपर दिला होता. मात्र,पेपर चांगला गेला नसल्याने व आपण नापास होऊ व आई वडीलांच्या अपेक्षा पूर्ण करु शकणार नाही,या भितीने पहाटे तीन वाजताच्या सुमारास महेश नगर दिग्रस येथे आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनं तालुक्यात खळबळ उडाली आहे.