
मुंबई प्रतिनिधी
एप्रिल महिना संपत येत असल्याने, अनेक लोक मे महिन्यात येणाऱ्या बँक हॉलिडेची आतुरतेने वाट पाहत असतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मे 2025 महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी अधिकृतपणे जाहीर केली आहे, ज्यामध्ये बँका एकूण 13 दिवस बंद राहतील.
त्यामुळे तुमची बँकेचे कामे लवकर करून घ्या, अन्यथा तुमची मोठी अडचण होऊ शकते. मे 2025 महिन्यातील बँक किती दिवस आणि का? बंद आहे यावर एक नजर टाकुयात….
‘मे’ महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांची यादी :
१ मे २०२५, गुरुवार : मे महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक राज्यांमध्ये बँका बंद असणार आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रात बँका बंद असणार आहेत.
४ मे २०२५ रविवार : रविवार असल्याने देशातील सर्व बँका बंद असणार आहेत.
८ मे २०२५ : गुरु रविंद्र जयंतीनिमित्त दिल्ली, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर आणि त्रिपुरा येथील बँका बंद असणार आहे.
१० मई २०२५ : दुसऱ्या शनिवारी बँका बंद असणार आहे.
११ मे २०२५ रविवार : रविवार निमित्त संपूर्ण देशात बँका बंद असणार आहेत.
१२ मे २०२५ सोमवार : बुद्ध पोर्णिमानिमित्त उत्तराखंड, ओडिशा, छत्तीसगड, सिक्किम, महाराष्ट्र येथे बँका बंद असणार आहे.
१६ मे, शुक्रवार : सिक्किम राज्य दिवसानिमित्त सिक्किममध्ये बँका बंद असणार आहे.
१८ मे २०२५, रविवार : वीकेंड असल्याने बँका बंद असणार आहे.
२४ मे २०२५ : चौथ्या शनिवारी देशातील बँका बंद असणार आहे.
२५ मे २०२५ : रविवार असल्याने देशातील बँका बंद असणार आहे.
२६ मे २०२५ सोमवार : काजी नजरुल इस्लाम जयंतीनिमित्त त्रिपुरामध्ये बँका बंद असणार आहे.
२९ मे २०२५ : महाराणा प्रताप जयंतीनिमित्त राजस्थान, हिमाचल प्रदेश, हरियाणा येथे बँका बंद असणार आहे.
३० मे २०२५ : श्री गुरु अर्जुन देवजी यांचा शहीद दिवस म्हणून काही राज्यांमध्ये बँका बंद असणार आहेत.
या सुट्ट्या संपूर्ण महिन्यासाठी असतात, ज्यामध्ये आठवड्याचे शेवटचे दिवस आणि राष्ट्रीय आणि प्रादेशिक उत्सवांसाठी विशिष्ट तारखा समाविष्ट असतात. बहुतेक सुट्ट्यांचा परिणाम देशभरातील बँकिंग क्षेत्रावर होईल, तर काही सुट्ट्या क्षेत्र-विशिष्ट असतील आणि फक्त काही राज्यांवरच परिणाम करतील.