
उल्हासनगर अंबिका मंदिराच्या पायऱ्यांवर रविवारी पहाटे एका गोणीमध्ये स्रीजातीचे बाळ ठेवल्याचा माणुसकीला कलंक लावणारा प्रकार उघडकीस आला आहे.परिसरातील लोकांनी स्थानिक समाजसेवक संदीप डोंगरे व राकेश माने यांना संपर्क केला.संदीप डोंगरे व राकेश माने यांनी याबाबत विठ्ठलवाडी पोलिसांना माहिती देऊन.बाळाला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४, येथील अंबिका मंदिराच्या पायऱ्यावर ठेवलेल्या गोणीत हालचाल होतांना काही नागरिकांना दिसलें. त्यांनी याबाबतची माहिती समाजसेवक संदीप डोंगरे व राकेश माने यांना दिल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गोणी उघडली असता त्यामध्ये नुकतेच जन्मलेले स्त्री जातींचे जिवंत बाळ दिसले. त्यांनी याबाबत विठ्ठलवाडी पोलिसांना माहिती दिल्यावर पोलीस व समाजसेवक संदीप डोंगरे, राकेश माने यांनी बाळाला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी बाळावर उपचार सुरु केले असून बाळाची तब्येत ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
समाजसेवक संदीप डोंगरे व राजेश माने यांनी बाळ अंबिका मंदिरात सापडल्याने, बाळाचे नाव अंबिका असे ठेवले. विठ्ठलवाडी पोलीस बाळाच्या आईचा शोध घेत असून याबाबत गुन्हा दाखल करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहे.