
मुंबई प्रतिनिधी
वांद्रे रेल्वे स्थानकच्या पुर्वेकडील बाजूस रिक्षाचालकांकडून प्रवाशांना नियमबाह्य भाडे आकारणे, शेअरिंग रिक्षाच्या नावाखाली दुप्पट पैसे उकळणे, जवळच्या प्रवासासाठी नकार देणे, उद्धटपणे बोलणे तसेच धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे यासारख्या तक्रारींनी प्रवाशांचा त्रास वाढला आहे. या संदर्भात अनेक नागरिकांनी आमदार वरुण सरदेसाई यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर आमदार सरदेसाई यांनी परिवहन विभागाचे अधिकारी आणि ट्रॅफिक पोलिसांसह वांद्रे रेल्वे स्थानकाला भेट दिली. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांना प्रवाशांच्या समस्या समजावून सांगितल्या.
या वेळी अधिकाऱ्यांनी मुजोर रिक्षाचालकांवर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान बोलताना आमदार वरुण सरदेसाई म्हणाले, “मी लवकरच रेल्वे प्रशासन, महापालिका, ट्रॅफिक पोलीस आणि इतर संबंधित यंत्रणांना घेऊन वांद्रे स्थानक परिसरासाठी एक सर्वसमावेशक ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लान तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.