
मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदांच्या एकूण 690 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.
यामधील दुय्यम अभियंता (स्थापत्य) या संवर्गाची 9 मार्च 2025 रोजी नियोजित ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता दुय्यम अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अभियांत्रिकी संवर्गातील दुय्यम अभियंता (स्थापत्य) संवर्गाची ऑनलाईन परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार 13 मे 2025 आणि 14 मे 2025 रोजी घेण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अभियांत्रिकी संवर्गातील एकूण 690 रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षांचा कालावधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आला आहे. यातील, दुय्यम अभियंता (स्थापत्य) या संवर्गाची 9 मार्च 2025 रोजी नियोजित ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा आता 13 मे 2025 आणि 14 मे 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. सर्व संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे महानगरपालिका प्रशासनाने म्हटले आहे.
या 690 पदांसाठी भरती
पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
वेतनश्रेणी – स्तर M23 – रुपये 41,800 – 1,32,300 + अनुज्ञेय भत्ते
एकूण पदे – 250
गट – क
पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)
वेतनश्रेणी – स्तर M23 – रुपये 41,800 – 1,32,300 + अनुज्ञेय भत्ते
एकूण पदे – 130
गट – क
पदाचे नाव – दुय्यम अभियंता (स्थापत्य)
वेतनश्रेणी – स्तर M25 – रुपये 44,900 – 1,42,400 + अनुज्ञेय भत्ते
एकूण पदे – 233
गट – ब
पदाचे नाव – दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)
वेतनश्रेणी – स्तर M25 रुपये 44900 – 1,42,400 + अनुज्ञेय भत्ते
एकूण पदे – 77
गट – ब