
मुंबई प्रतिनिधी
मद्यपींची आता खैर नाही
मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांना आता मोठी शिक्षा होण्याची शक्यता आहे. यापुढे मद्यपानकरुना गाडी चालवणारा चालक सापडल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
याबाबतचे आदेश सर्व वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित चालकाचा परवाना रद्द करण्याची आणि वाहन जप्त करण्याची शिफारस पोलीस करणार आहेत. कोणत्याही व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्यास त्याला भविष्यात पासपोर्ट मिळवण्यास, परदेशी प्रवास करण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.
मद्यपान करून गाडी चालवल्यास गुन्हा दाखल होतो, ज्यात दंड, तुरुंगवास आणि वाहन परवाना रद्द होण्याची शक्यता असते.
त्याचबरोबर मद्यधर्माखाली वाहन चालवल्यास मोटर वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. या गुन्ह्यासाठी १०,००० ते २०,००० रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. तसंच, काही गंभीर प्रकरणांमध्ये, मद्य राशन करून वाहन चालवल्यास तुरुंगवास देखील होऊ शकतो.
वाहन परवाना रद्द
वारंवार मद्यधर्माखाली वाहन चालवल्यास वाहन चालवण्याचा परवाना रद्द होऊ शकतो. तर काही प्रकरणांमध्ये, मध्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्याचे वाहन जप्त देखील केले जाऊ शकते. मद्यधर्माखाली वाहन चालवल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता असते, ज्यामुळे जीवितहानी किंवा गंभीर दुखापत होऊ शकते. यामध्ये पोलिसांनी मद्यधर्माखाली वाहन चालवणाऱ्याला अटक केल्यास, तेथेच किंवा पोलिस ठाण्यात ब्रेथ टेस्ट किंवा रक्ताची तपासणी केली जाते. या गुन्ह्यात दोषी आढळल्यास, चालकाला न्यायालयात जावं लागतं आणि शिक्षा सुनावण्यात येते.