
उमेश गायगवळे
परिमंडळ ८ मधील सात पोलीस ठाण्याकडून हस्तगत केलेला मुद्देमाल आज दि २ एप्रिल २०२५ रोजी वांद्रे बीकेसी पासयदान हॉल बीकेसी पोलीस ठाणे पहिला मजला बीकेसी येथे नागरिकांना सुपूर्द करण्यात आला.
परिमंडळ ८ अंतर्गत येणाऱ्या खेरवाडी पोलीस ठाणे, निर्मल नगर, वाकोला, विलेपार्ले, सहार विमानतळ, या सात पोलीस ठाण्याकडून हस्तगत केलेल्या मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला.
यामध्ये जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, मोबाईल,
मौल्यवान वस्तू,रोख रक्कम, आधी मुद्देमाल ऐकून ६८ लाख ३८ हजार ६३५ रुपये किमतीची मालमत्ता तसेच सायबर गुन्ह्यातील एकूण रुपये १८ लाख २४ हजार, अशी एकूण ८६ लाख ६२ हजार ६३५ रुपये किमतीची मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली होती.
मालमत्ता परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांच्या हस्ते ८९ तक्रारदार मालक यांना सुपूर्द करण्यात आली.
या कार्यक्रमास तक्रारदार आवर्जून उपस्थित होते तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त खेरवाडी विभाग, सहाय्यक पोलीस आयुक्त विमानतळ विभाग, सात पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.