
मुंबई प्रतिनिधी
दादर येथील हिंदू कॉलनीतील टेक्नो हाइट्स इमारतीवरून उडी घेऊन 20 वर्षीय कॉलेज तरुणीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दादरच्या प्रसिद्ध असलेल्या हिंदू कॉलनीतील टेक्नो हाइट्स या 14 मजली इमारतीच्या आठव्या मजल्यावर ती कुटुंबियांसह राहत होती. ती जय हिंद कॉलेजची विद्यार्थिनी आहे.
काल रात्री तिचा एक मित्र आणि मैत्रीण भेटायला आले होते.
त्यांच्यात काही बोलणं झाल्यानंतर ती तरुणी इमारतीच्या छतावर गेली तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते मात्र अचानक तिने उडी मारली. तिचा जागीच मृत्यू झाला माटुंगा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टम साठी सायन रुग्णालयात पाठवला पोलिसांनी अपघात म्हणून प्राथमिक नोंद केली असून माटुंगा पोलीस अधिक तपास करत आहे.