
मुंबई प्रतिनिधी
गेल्याच आठवड्यात पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन 4 महिन्यांहून अधिक कालावधी होऊन गेला आहे, तरी देखील प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश थांबण्याचे नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं मंगळवारी (ता.1 एप्रिल) पुन्हा एकदा सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये भारत बास्टेवाड यांची नागपूरमध्ये रोजगार हमी योजनेच्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. तर लक्ष्मी नारायण मिश्रा यांची एमएसआरडीसीमध्ये सहाय्यक व्यवस्थापकपदी बदली करण्यात आली आहे. तर वरिष्ठ आयएएस अधिकारी निधी पांडे यांची लघुउद्योग खात्याच्या व्यवस्थापक संचालकपदी बदली करण्यात आली आहे.
तसेच रुसा प्रकल्प संचालक राजेंद्र भारुड यांची मुंबईतील उद्योग संचलनालयात अतिरिक्त विकास आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. डॉ. राजेंद्र भारुड यांची फेब्रुवारी महिन्यात TRTI च्या आयुक्तपदावरून रुसामध्ये प्रकल्प संचालक म्हणून बदली करण्यात आली होती. त्यानंतर काहीच दिवसांमध्ये त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे उद्योग विभागाच्या अतिरिक्त विकास आयुक्तपदाचा कार्यभार देण्यात आला आहे.
बदली करण्यात आलेले अधिकारी पुढीलप्रमाणे :
1. इंदुराणी जाखर – पालघर जिल्हाधिकारी
2 – वैष्णवी बी – अतिरिक्त आयुक्त, नागपूर मनपा
3. भारत बास्टेवाड – रोजगार हमी योजना, नागपूर
4 . राजेंद्र भारूड – अतिरिक्त विकास आयुक्त, उद्योग
5. नेहा भोसले – रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी
6. लक्ष्मी नारायण मिश्रा – जॉईन्ट एमडी, एमएसआरडीसी
7. निधी पांडे – व्यवस्थापक संचालक, लघुउद्योग,