
मुंबई प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्यात बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात आली. बाईक टॅक्सीला परवानगी देतानाच या बाईक टॅक्सीला नियमांच्या आधीन राहूनच काम करावे लागणार आहे.
पावसाळ्यात कव्हर असलेल्या बाईक टॅक्सीलाच परवानगी मिळेल असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तसेच पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक टॅक्सीलाही परवानगी देण्यात येणार नाही असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. एका संस्थेला केवळ 50 बाईक टॅक्सी चालविण्याची परवानगी मिळणार आहे.
* स्वस्त आणि झटपट प्रवास
बाईक टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा आवश्यक असेल. बाईकस्वाराच्या पाठी बसणाऱ्यास सुध्दा हेल्मेट बंधनकारक असणार आहे. या बाईकच्या नोंदणी क्रमाकांची (नंबर प्लेट) पाटी पिवळ्या रंगाची असेल. बाईक टॅक्सीमधील दुचाकीसाठी विशिष्ट रंग ठरवण्यात येणार आहे.
बाईक टॅक्सी चालकाला बॅचची सक्ती असेल. हा बॅच परिवहन विभाग नोंदणी करून देईल. पोलीस पडताळणीत करूनच चालक परवाना बॅच मिळणार असल्याचे समोर येत आहे. महिलांसाठी खास महिला बाईक रायडर असावेत अशी सूचना संबंधित बाईक टॅक्सी सेवा देणार्या कंपनीस देण्यात येतील.
* पार्टिशन लावणे बंधनकारक
ओला, उबेरच्या धरतीवर बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात आली आह. त्यामुळे प्रवाशांना तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागणार नाही. मुंबईकरांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. मुंबईत यापूर्वी रॅपिडोने सेवा सुरू केली होती. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद ही मिळाला. पण टॅक्सी आणि ऑटो चालकांनी त्याला कडाडून विरोध केला होता. याविषयीचे शासन दरबारी कोणतेही धोरण नव्हते. त्यामुळे ही सेवा बंद झाली होती. आता ही सेवा पुन्हा सुरू होणार आहे. तर बाईक टॅक्सीमध्ये महिला सुरक्षेवर भर देण्यात येत आहे. बाईक चालकाला पाठीमागे प्रवाशी बसवताना बाईकच्या मध्यभागी पार्टिशन लावणे बंधनकारक असणार आहे.