
मुंबई प्रतिनिधी
जगभरातून पर्यटक मुंबई पाहाण्यासाठी येत असतात आता आणखी एक पर्यटनस्थळ मुंबईत तयार झालं असून ते येत्या रविवारी खुले होणार आहे.
त्यामुळे मुंबईच्या पर्यटनात आणखी एका पर्यटन स्थळाची भर पडली आहे.
मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना गुढी पाडव्याला हे पर्यटन स्थळ गिफ्ट मिळणार असून येथील निसर्गाच्या सानिध्यात नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल
मुंबईतील मलबार हिल परिसरात तयार करण्यात आलेला ‘नेचर वॉक वे’ सोमवार पासून नागरिकांसाठी खुला होणार आहे. 700 मिटर लांबी असलेल्या नेचर वॉक वे साठी तिकीट असणार आहे.
या नेचर वॉक वे चे श्रेय आदीत्य ठाकरे यांना मिळाल्यामुळे येत्या रविवारी होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यात राजकीय श्रेयवादाची लढाई होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना गुढी पाडव्याला मलबार हिल येथे तयार करण्यात आलेला नेचर वॉक वे या नव्या पर्यटन आणि निसर्गरम्य स्थळाचं गिफ्ट मिळणार आहे.
रविवारी याचे उद्घाटन होणार असून नागरिकांसाठी हा मार्ग खुला होणार आहे.
येथे वॉक करत असताना
नागरिकांना विविध गाणी, रंगीत लाइटिंग आणि निसर्गाचा अनुभव घेता येणार आहे.
या नेचर वॉक वेचे श्रेय आमदार आदित्य ठाकरे यांना देण्यात येत असल्याने राजकीय लढाई देखील रंगत आहे.
त्यामुळे, लोकार्पण कोणाच्याहस्ते संपन्न होणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले असून मुंबईकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.