
उमेश गायगवळे
वांद्रे पूर्व येथील शिवसेना ठाकरे गट, आमदार वरुण सरदेसाई यांच्या प्रयत्नांमुळे वांद्रे पूर्व येथील गौतम समता सेवा संघातील रहिवाशांना त्याच परिसरात हक्काची घरे मिळाली आहेत. या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी आमदार वरुन सरदेसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी सतत पाठपुरावा केला. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा प्रकर्षाने मांडून सरकारचे लक्ष वेधले होते.
वांद्रे पूर्व विधानसभा निवडणुकीनंतर आमदार सरदेसाई यांनी मतदारसंघातील प्रत्येक सोसायटीला भेट देण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला. ७ फेब्रुवारी रोजी गौतमनगर, समता सेवा संघाच्या रहिवाशांनी आमदार सरदेसाई यांची भेट घेऊन ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत उच्च न्यायालयाच्या इमारतीसाठी भूखंड आरक्षित केल्याने त्यांच्या घरांच्या निष्कासनाच्या नोटिसा मिळाल्याची व्यथा मांडली. रहिवाशांना जबरदस्तीने मालाड आप्पापाडा या भागांत स्थलांतरित करण्यासाठी घरांची लॉटरी काढण्यात आली होती.
परिणामी, वर्षानुवर्षे वांद्रे परिसरात राहणाऱ्या या रहिवाशांना आपली घरे सोडावी लागणार होती. त्यामुळे रहिवाशांनी सरदेसाई यांच्याकडे वांद्रे परिसरातच घरे मिळवून देण्याची विनंती केली.
आमदार सरदेसाई यांच्या पाठपुराव्यामुळे २६ मार्च रोजी घरांची लॉटरी सोडत काढण्यात आली. यामध्ये गौतम समता सेवा संघाच्या रहिवाशांना वांद्रे पूर्वेतील खेरवाडी येथील ओम साई सी. एच. एस, एसआरए आणि बालाजी एस आर ए इमारतीमध्ये हक्काची घरे मिळाली.
यावेळी शिवसेना पदाधिकारी शाखाप्रमुख अरुण कांबळे, माजी नगरसेवक अनिल त्रिंबककर, माजी नगरसेविका रोहिणी कांबळे, जय सरपोतदार, हरी शास्त्री, शशिकांत येल्लमकर, सुरेश होलगुंडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक आमदार वरून सरदेसाई आपल्या मतदारसंघात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अडी- अडचणी जाणून घेण्यासाठी सदैव तप्तर असतात.
देसाई यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.वांद्रे पूर्व येथील गौतम समता सेवा संघातील रहिवाशांना वांद्र्यातच घरे मिळाल्याने रहिवाशांनी त्यांचे आभार मानले आहेत.