
मुंबई प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त कविता करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला
पोलिसांनी समन्स बजावले आहे.
पोलिसांनी कुणाल कामराला सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र कुणाल मुंबईत नसल्याने कुणालच्या वडिलांकडे हे समन्स सोपवण्यात आले. याशिवाय, पोलिसांनी कुणाल कामराला WhatsApp द्वारे समन्स पाठवले असून चौकशीसाठी त्याला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.
खार पोलिसांनी कुणाल कामराच्या घरी समन्स पाठवून आज, मंगळवारी सकाळी 11 वाजता तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. कुणाल सध्या मुंबईत नाही. स्टँड-अप कॉमेडी शो दरम्यान केलेल्या वक्तव्याबद्दल एमआयडीसी पोलिसांनी कुणाल कामराच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. आता तो पुढील तपासासाठी खार पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे, असे मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.