
नवी दिल्ली वृत्तसंस्था
केंद्र सरकारने नागरिकांच्या हितासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आयुष्मान भारत योजना राबवली आहे. या योजनेत नागरिकांना ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात. या योजनेचा लाभ देशातील कोट्यवधी नागरिक घेत आहेत.
२०१८ मध्ये केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना सुरु केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आयुष्मान कार्ड असणे गरजेचे आहे.
आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. त्या अटींमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत मोफत उपचार घेण्यासाठी फक्त सरकारी रुग्णालय नाही तर तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येही उपचार घेऊ शकतात.
आयुष्मान भारत योजनेत तुम्ही कोणत्या रुग्णालयातून मोफत उपचार घेऊ शकता हे घरबसल्या चेक करु शकतात. यासाठी ऑनलाइन सोपी प्रोसेस आहे.
यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर pmjay.gov.in जावे लागेल. त्यानंतर तिथे “Find Hospital” या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर राज्य, जिल्हा आणि हॉस्पिटल टाइप करावे लागेल. यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटलच्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
या योजनेत ज्या आजारावर उपचार घ्यायचा आहे. ते सिलेक्ट करा. त्यानंतर Empanelment Type मध्ये PMJAY सिलेक्ट करायचे आहे. यानंतर कॅप्चा कोड टाकून सर्च ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला सर्व प्रायव्हेट हॉस्पिटलची लिस्ट दिसणार आहे. यामध्ये तुम्ही कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकतात. त्याची माहिती असणार आहे.