
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवनेरी बस चालकाने तिघांना चिरडल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर अन्य दोघे गंभीर जखमी आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रणय बोडके (वय-29 वर्षे) असे मृत तरुणाचं नाव आहे. करण शिंदे आणि दुर्वेश गोरडे हे दोघे गंभीर जखमी असून त्यांचावर ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दादरमधील प्रभादेवी स्टेशनजवळील ब्रिजवर हा भीषण अपघात झाला. प्रणय, करण आणि दुर्वेश हे तिघे स्कूटरवरून मार्केटमध्ये फुले आणण्यासाठी जात होते. तितक्यात समोरून येणाऱ्या भरधाव शिवनेरी बसने तिघांना दोरदार धडक दिली. अपघातात तिघे तरुण गंभीर जखमी झाले. तिघांना तातडीने केईम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रणय बोडके या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. तर करण आणि दुर्वेशची प्रकृती गंभीर असल्याने दोघांना पुढील उपचारासाठी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपाचार सुरू आहेत.
चालक पळून जाण्याच्या तयारीत होता तितक्यात…
इकबाल शेख असे बस चालकाचे नाव असून त्याने चुकीच्या दिशेने बस आणल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. अपघातानंतर चालक पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी चालकाला पकडून भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.