
वार्ताहर-स्वप्नील गाडे
वांद्रे पूर्व येथे नवीन सुसज्ज अशी शासकीय वसाहत बनविण्यात अली आहे.या वसाहतीत १६ -माळे असलेल्या इमारती शासकीय कर्मचाऱ्यांना रहाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तयार केल्या आहेत.गेले पाचमहिने शासकीय कर्मचारी येथे वास्तव्य करीत आहेत.परंतु पाच महिने झाले येथील रहिवाशांना २०मिनिटे पाणी पुरवठा PWDविभागा कडून केला जात आहे.नवीन वसाहतीच्या रहिवाशांना २४ तास पाणी पुरवठा इमारती मध्ये दिला जाईल असे PWDविभागाकडून सांगण्यात आले होते परंतु रहिवाशांना फक्त २० मिनिटेच पाणी पुरवठा केला जातोय या कमी पाण्याच्या पुरवठ्या मुले स्थानिक रहिवाशांनमध्ये शासना बद्दल नाराजी निर्माण झाली आहे.आज गुरुवार दि-१७/१०/२०२४ रोजी दुपारी २वाजता शासकीय कर्मचाऱ्याच्या कुठुमबीयांनी स्थानिक PWDकार्यालयावर धडक मोर्चा आणून उप अभियंता उप-विभाग -३ च्या अधिकाऱ्यांना संताप्त रहिवाशांनी घेराव घालून जाब विचारन्यात आला.रहिवाशांचा जमाव बघून स्थानिक पोलिसांना बोलावण्यात आले.पोलिसांनी जमलेल्या रहिवाशांची समजूत घालून शांत करण्यात आले.उप अभियंता यांनी सात दिवसात योग्यरीत्या पाणीपुरवठा केला जाईल असे लेखी स्वरूपात पत्रक देऊन आश्वासन दिले आहे