
मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं घवघवीत यश मिळवून दिलं होतं.गेल्या वर्षी जुलै 2024 पासून सुरु झालेल्या या योजनेच्या 7 हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांना मिळाली. आठवा हप्ता मात्र मिळाला नव्हता.
त्यातच सरकारकडून 9 लाखांहून अधिक अपात्र महिलांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे. अशातच फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये लाभार्थी महिलांना लाडक्या बहीण योजनेचे मिळालेले नाहीत. त्याचमुळे महिलांची धडधड वाढली असतानाच आता या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना महिला दिनाचं मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे.कारण सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा 1500 रुपयांचे दोन हप्ते सोबत मिळणार आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवाहफ्त होण्यापूर्वी सरकारच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं होतं. आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, 8 मार्चला महिला दिनानिमित्त महिलांसाठी या सभागृहात विशेष सत्र आयोजित केलं जाणार आहे. 8 तारखेला शनिवार असताना देखील हे सत्र आयोजित केलं आहे. तसंच सर्वात लाडकी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हफ्ताचे पैसे महिलादिनाच्या पुर्वसंध्येला सर्व महिलांच्या खात्यात जमा करणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तर याबाबतची प्रक्रिया 5 ते 6 तारखेपासून सुरू केली जाईल आणि 8 तारखेआधी सर्व पैसे जमा होतील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.