सातारा प्रतिनिधी
शिरवळ : कांतीलाल डोंगरदिवे वधू-वर सूचक केंद्राच्या वतीने रविवार, १ नोव्हेंबर रोजी शिरवळ येथे राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत तुळजाभवानी मंगल कार्यालय, शिरवळ पोस्ट ऑफिससमोर, ता. खंडाळा येथे हा मेळावा होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील डोंगरदिवे वधू-वर सूचक केंद्राने आतापर्यंत १५ हजार ७७५ विवाह जुळवून दिले असून, हजारो कुटुंबांना संसारासाठी मार्गदर्शन केले आहे. या उपक्रमाचा लाभ अधिकाधिक युवक-युवती आणि पालकांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल डोंगरदिवे यांनी केले आहे.
मेळाव्यात विविध जिल्ह्यांतील इच्छुक वधू-वर आणि पालकांना प्रत्यक्ष भेट, संवाद आणि माहितीची देवाणघेवाण करता येणार आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया, स्वतंत्र कक्ष आणि मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मेळाव्यास आरपीआयचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, शिरवळचे आदर्श सरपंच रविराज दुधगावकर, मधुकर नाटकर (कराड), भारतीय बौद्ध महासंघाचे खंडाळा तालुकाध्यक्ष संजय जाधव, शरद खुंटे (भोळी), अशोक गायकवाड (अजनुज), माणिक आवाडे, डॉ. विजय शिंदे (शिरवळ), बाळासाहेब भोसले (भादवडे), सुनील खुंटे, दिनकर खुंटे, दिलीप खुंटे, कणेश भोसले, संदीप गायकवाड, महादेव कांबळे, अशोक जाधव (शिरवळ), आदिनाथ गायकवाड, किशोर गायकवाड, युवराज खुंटे, आदित्य जाधव, संतोष चव्हाण आणि नवनाथ मोरे उपस्थित राहणार आहेत.
इच्छुकांनी मेळाव्यास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कांतीलाल डोंगरदिवे यांच्याशी ९८८१९५०७५४ किंवा ८४२११०२४५२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.


