मुंबई प्रतिनिधी
मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर सध्या १९८०च्या दशकातील रेट्रो फोटोंचा ट्रेंड चांगलाच व्हायरल होत आहे. साधा फिल्टर वापरण्याऐवजी युजर्स आपले फोटो एआय टूलच्या मदतीने ८०च्या दशकातील क्लासिक अॅनालॉग कॅमेरा लूकमध्ये रूपांतरित करत आहेत. विशेष म्हणजे, चॅटजीपीटीमध्ये स्वतःचा फोटो अपलोड करून त्यासोबत योग्य प्रॉम्प्ट दिल्यास त्या काळातील कपडे, हेअरस्टाइल, पार्श्वभूमी आणि कॅमेऱ्याचा इफेक्ट असलेला फोटो तयार करता येत आहे.
इन्स्टाग्राम स्टोरीजवरील ‘Add Yours’ स्टिकरच्या माध्यमातून युजर्स हे रेट्रो फोटो आणि त्यासाठी वापरलेले प्रॉम्प्ट्स एकमेकांसोबत शेअर करत आहेत. ‘४० वर्षांपूर्वी माझा फोटो काढला असता, तर मी कसा दिसलो असतो?’ या कल्पनेवर आधारित हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे.
एआयच्या माध्यमातून तयार होणाऱ्या या फोटोंमध्ये ८०च्या दशकातील वॉर्म लायटिंग, सॉफ्ट फोकस, फिल्म ग्रेन आणि जुन्या अॅनालॉग कॅमेऱ्याची टेक्सचर यांचा वापर केला जात आहे. भारतीय युजर्सकडून या ट्रेंडमध्ये त्या काळातील पारंपरिक फॅशनलाही पसंती दिली जात आहे. महिलांसाठी रंगीबेरंगी साड्या, ८०च्या दशकातील हेअरस्टाइल आणि पारंपरिक दागिने, तर पुरुषांसाठी त्या काळातील शर्ट, हाय-वेस्ट ट्राउझर्स, मिशा आणि क्लासिक हेअरकट अशा लूकमध्ये फोटो तयार केले जात आहेत.
याशिवाय ८०च्या दशकातील बॉलिवूड हिरो-हिरॉईन, जुना कौटुंबिक अल्बम, दूरदर्शनचा काळ, जुन्या मॅगझिनचे कव्हर आणि १९८०च्या दशकातील लग्नाचे फोटो अशा विविध थीम्सही युजर्सकडून वापरल्या जात आहेत. त्यामुळे जुन्या आठवणी आणि आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा अनोखा संगम या ट्रेंडमध्ये पाहायला मिळत आहे.
हा ट्रेंड तुम्हालाही ट्राय करायचा असेल तर सर्वप्रथम चॅटजीपीटी उघडून तुमचा स्पष्ट फोटो अपलोड करा. त्यानंतर फोटोमध्ये १९८०च्या दशकातील कपडे, हेअरस्टाइल, बॅकग्राउंड आणि अॅनालॉग कॅमेरा इफेक्ट हवा असल्याचे स्पष्टपणे नमूद करा. एआयकडून फोटो तयार झाल्यानंतर तो सेव्ह करून इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘Add Yours’ स्टिकरच्या माध्यमातून शेअर करता येईल.
८०च्या दशकातील बॉलिवूड हिरॉईन लूकसाठी, “Turn this photo into a glamorous 1980s Bollywood heroine portrait. Keep my face recognisable and natural. Style the hair with a voluminous 1980s look, add a colourful saree and statement jewellery, and place me in a classic Indian studio setting with soft focus and analogue film grain.” असा प्रॉम्प्ट वापरता येईल.
बॉलिवूड हिरो लूकसाठी, “Recreate this photo as a 1980s Bollywood hero studio portrait. Keep my facial identity unchanged. Give me an authentic period hairstyle, moustache if appropriate, tucked shirt, high-waisted trousers and a classic studio backdrop with warm lighting.” हा प्रॉम्प्ट उपयोगी ठरू शकतो.
क्लासिक फॅमिली अल्बम लूकसाठी, “Recreate this photo as if it were taken in an Indian family photo album in the mid-1980s. Add period-appropriate clothes, hairstyle and background, with a simple indoor setting, analogue camera texture, slight grain and realistic film colours.” असा प्रॉम्प्ट वापरता येईल. तर दूरदर्शनच्या काळातील लूकसाठी, “Recreate this photo with the visual style of an Indian television portrait from the 1980s. Use authentic period clothing, hairstyle, simple studio background, warm lighting and analogue film grain.” असा प्रॉम्प्ट देऊन फोटो तयार करता येतो.
एआयच्या मदतीने काही क्षणांत तयार होणाऱ्या या रेट्रो फोटोंमुळे सोशल मीडियावर जुन्या काळाची आठवण करून देणाऱ्या छायाचित्रांना नव्याने लोकप्रियता मिळताना दिसत आहे.

