
पत्रकार :उमेश गायगवळे
दादर परिसरात किरकोळ कारणावरून वाद झाल्या नंतर राग मनात धरून तिघांनी तायकांदो प्रशिक्षकावर प्राण घातक हल्ला केला. सुदैवाने प्रशिक्षक बचावला असून हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या गंभीर घटनेची दखल शिवाजी पार्क पोलिसांनी घेऊन तात्काळ विशेष पथक तयार करून सायन येथून तीन आरोपींना 24 तासात अटक केली. अटक केलेले आरोपी १)मनोज सिंग तेजसिंग 23, इम्रान नूर मोहम्मद शेख 28, मनीष राजेश विंग 24, या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. परिमंडळ पाच चे पोलीस उपयुक्त गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास दातीर, पोलीस निरीक्षक सरनोबत, पोलीस उपनिरीक्षक योगेश राणे, अधिष्ठापणी गुप्त माहितीच्या आधारे आरोपींची माहिती घेऊन आरोपींना गजाआड केल आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.