मुंबई प्रतिनिधी
मुंबई पोलीस दलातील प्रशासकीय फेरबदल आणि पदोन्नती प्रक्रियेला वेग आला असून सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली आहे. शुक्रवारी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी आणखी ४३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) पदावर पदोन्नती देत त्यांच्या नव्या नियुक्त्यांचे आदेश जारी केले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत एकूण ६१ वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी पदावर विराजमान झाले आहेत.
यापूर्वी गुरुवारी (२५ जून) मुंबई पोलीस दलातील ११० अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली होती. त्यामध्ये १८ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त, तर ९२ पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर बढती देण्यात आली होती. त्या पदोन्नतीनंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेशही काढण्यात आले होते. उर्वरित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित होता. अखेर शुक्रवारी त्यांनाही एसीपीपदाची बढती देत विविध विभागांमध्ये नियुक्ती करण्यात आली.
या नव्या आदेशांनुसार सशस्त्र पोलीस दलातील श्रीमंत बचाराम शिंदे यांची विशेष शाखा-१ मध्ये, तर अनिल रामचंद्र आव्हाड यांची सशस्त्र पोलीस कोषात नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर नियंत्रण कक्षातील रविंद्र परमेश्वर अडाणे आणि चारकोप पोलीस ठाण्याचे विनायक उत्तमराव चव्हाण यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली.
गुन्हे शाखेतील सुवर्णा विजय अडसुळ आणि सुनील काशिनाथ चंद्रमोरे यांनाही गुन्हे शाखेतच नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. संरक्षण व सुरक्षा विभागातील महेंद्र बाळशिराम मोरे, राजेश रघुनाथ कासारे, मंदाकिनी रामचंद्र नरोटे, संजय सदाशिव सागवेकर आणि जुबेदा मोहम्मद रजा शेख यांची अनुक्रमे सायन विभाग, पूर्व नियंत्रण कक्ष, उत्तर नियंत्रण कक्ष, संरक्षण व सुरक्षा विभाग आणि निर्मलनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
निर्मलनगर पोलीस ठाण्याचे रमेश चिमाजी वाघ यांची पश्चिम नियंत्रण कक्षात, तर मानखुर्द पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु अरुण घोरपडे यांची मध्य नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतूक विभागातील जयश्री जितेंद्र गजभिये, आनंद परशुराम हाके आणि सायरस ओमन ईराणी यांची अनुक्रमे सशस्त्र पोलीस कोष आणि वाहतूक विभागात बदली करण्यात आली.
आंबोली पोलीस ठाण्याचे प्रमोदकुमार श्रीराम कोकाटे यांची देवनार विभागात, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अनघा अशोक सातवसे यांची संरक्षण व सुरक्षा विभागात, तर विशेष शाखा-२ मधील प्रसाद जगन्नाथ साटम आणि मनिषा किशोर पाटील यांची विशेष शाखा-२ मध्येच नियुक्ती करण्यात आली आहे.
विमानतळ पोलीस ठाण्याचे सुहास वामनराव चव्हाण यांची सशस्त्र पोलीस कोषात, व्ही. बी. नगर पोलीस ठाण्याचे पोपट निवृत्ती आव्हाड यांची दक्षिण नियंत्रण कक्षात, मेघवाडी पोलीस ठाण्याचे सुधाकर रामचंद्र हुबे यांची गोराई विभागात, विक्रोळी पोलीस ठाण्याचे सूर्यकांत शिवराम नाईकवाडी यांची संरक्षण व सुरक्षा विभागात, व्ही. पी. रोड पोलीस ठाण्याचे भारत आप्पाजी पाटील यांची वाहतूक विभागात, तर सागरी-१ पोलीस ठाण्याचे सुरेश पांडुरंग मदने यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.
याशिवाय वाहतूक विभागातील सोमेश्वर तुकाराम खाटपे, रमेश सदाशिव ढसाळ आणि रमेश यशवंत खिलारे यांची विशेष शाखा-१ मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्तर नियंत्रण कक्ष, विधानसभा सुरक्षा, विशेष शाखा-१ आणि विशेष शाखा-२ मधील राजेंद्र विश्वनाथ राणे, मोहिनी मनिष मोहाडीकर, प्रशांत विनायक सावंत आणि संध्या बुधाजी गावडे यांची अनुक्रमे मेघवाडी, मंत्रालय सुरक्षा, विशेष शाखा-१ आणि सशस्त्र पोलीस कोषात बदली करण्यात आली आहे. भोईवाडा पोलीस ठाण्याचे दत्तात्रय विष्णू ठाकूर यांची सशस्त्र पोलीस कोषात, सायन विभागाचे सुहास पांडुरंग कांबळे यांची सशस्त्र पोलीस नायगाव येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा जात पडताळणी समितीचे संजय रामचंद्र मोहिते यांची सायन विभागात, पूर्व नियंत्रण कक्षाचे अशोक संपतराव थुबे तसेच पश्चिम नियंत्रण कक्षाच्या शबाना इर्शाद शेख यांची सशस्त्र पोलीस कोषात बदली करण्यात आली आहे.
मुंबई पोलीस दलातील या व्यापक पदोन्नती आणि बदली प्रक्रियेमुळे विविध विभागांमध्ये प्रशासकीय बळकटी मिळणार असून नव्या जबाबदाऱ्या स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांकडून कायदा व सुव्यवस्था, गुन्हे नियंत्रण आणि नागरिकाभिमुख पोलीस सेवेला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


