
सांगली:प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील,आटपाडीचे सुपुत्र ए सरअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारे यांना भारतीय हवाईदलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर केले.
सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. एअर व्हाईस मार्शल सुहास भंडारे आटपाडी येथील पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते प्रभाकर भंडारे यांचे सुपुत्र, पत्रकार प्रशांत भंडारे यांचे जेष्ठ बंधू आहेत. मध्यम वर्गीय कुटुंबातूनआलेले भंडारे यांच्या अर्थात एअर व्हाईस मार्शल सुहास भंडारे यांनी आपल्या 36 वर्षांच्या कारकिर्दीत हवाई दलात असाधारण आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुहास भंडारे यांना अति विशिष्ट सेवा पदक जाहीर केले आहे.
जत आटपाडी हा दुष्काळी भाग असलेल्या दुष्काळी भागात आटपाडी या छोट्याश्या तालुक्यातील सुहास भंडारे यांनी हवाईदलात मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. नियुक्ती झालेल्या कामाच्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे. पुणे येथील सेव्हन टेट्रा स्कुलचे कमांडिंग ऑफिसर आणि पुणे येथील एअरफोर्स तळावर नाईन बी.आर.डी. चे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सध्या ते दिल्ली येथे सेवा बजावत आहेत. लवकरच राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते अति विशिष्ट सेवा बदक सुहास भंडारे यांना प्रदान केले जाणार आहे. आटपाडी येथील श्री भवानी विद्यालय, देशमुख महाविद्यालय आणि राजारामबापू हायस्कूल येथे त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. के.आय. टी.कॉलेज कोल्हापूरमधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनियरिंग पदवी तर आय.आय.टी.खरगपूर येथून त्यांनी एम.टेक पूर्ण केले.
2025 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारने 942 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक विजेत्यांची घोषणा केली आहे. हे कर्मचारी पोलीस, अग्निशमन सेवा, होमगार्ड, नागरी संरक्षण (HG&CD) आणि सुधारात्मक सेवांमध्ये कार्यरत आहेत. यापैकी 5 जवानांना मरणोत्तर शौर्य पदके जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये पोलीस उपअधीक्षक हिमायून मुझम्मिल (जम्मू आणि काश्मीर पोलीस), हेड कॉन्स्टेबल गिरिजेश कुमार उडदे (सीमा सुरक्षा दल), कॉन्स्टेबल सुनील कुमार पांडे (केंद्रीय राखीव पोलीस दल), हेड कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. रवी शर्मा (सशास्त्र सीमा बल) आणि सिलेक्शन ग्रेड फायरमन सतीश कुमार रैना यांचा समावेश आहे. त्यांना हे मोठा सन्मान मिळाल्याने त्यांच्या मूळ गावी उत्साहाचे वातावरण आहे.