मुंबई प्रतिनिधी
वर्षभर झटून अभ्यास केल्यानंतर आणि परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न, निकाल कधी लागणार? महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (HSC) फेब्रुवारी-मार्च 2026 दरम्यान घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आता अंतिम टप्प्यात असून, येत्या एक-दोन दिवसांत तो जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मंडळाने निकालासाठीची लिंक अधिकृत वेबसाइटवर सक्रिय केली असून, लाखो विद्यार्थी आपल्या गुणांची आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदा सुमारे 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
मेच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात निकाल?
सूत्रांच्या माहितीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होऊ शकतो. निकालाची अधिकृत तारीख व वेळ लवकरच जाहीर केली जाणार असून, निकाल साधारण दुपारच्या सुमारास उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
वेबसाइट आणि डिजीलॉकरवर उपलब्ध
यंदा विद्यार्थ्यांना दोन माध्यमांद्वारे निकाल पाहता येणार आहे.
पहिला पर्याय म्हणजे मंडळाची अधिकृत वेबसाइट, तर दुसरा पर्याय म्हणजे डिजीलॉकर. डिजीलॉकरवरून विद्यार्थ्यांना डिजिटल मार्कशीट डाउनलोड करता येईल, जी पुढील शैक्षणिक प्रक्रियेसाठी वैध मानली जाणार आहे.
निकाल जाहीर होण्यापूर्वी अंतिम तयारी
सध्या मंडळाकडून निकालाचा डेटा अपलोड आणि तांत्रिक पडताळणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे निकालाची घोषणा केली जाईल.
असा तपासा तुमचा निकाल
अधिकृत वेबसाइटवर जा
HSC Result लिंकवर क्लिक करा
रोल नंबर आणि आवश्यक माहिती भरा
‘Submit’ बटणावर क्लिक करा
स्क्रीनवर निकाल दिसेल
मार्कशीट डाउनलोड करून सेव्ह करा
या वेबसाईट्सवर पाहता येईल निकाल
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
results.digilocker.gov.in
mahahsscboard.in
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
निकाल पाहण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र (Hall Ticket) हाँल तिकिट जवळ ठेवावे. तसेच, अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासत राहावी, कारण निकाल कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो.
दरम्यान, निकालाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून, काही दिवसांतच त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांच्या हाती येणार आहे.


