
पत्रकार :उमेश गायगवळे
कॉल सेंटरच्या माध्यमातून प्रविण सोलंकी यांना 2 लाख 60 हजारांना फसवल्याप्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात 3 महिलांचाही समावेश आहे.
सांताक्रुज इथे राहणारे प्रवीण सोळंके यांना ऑनलाईन कर्ज देण्याच्या भानातून दोन लाख आठ हजार रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी 7 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 15 मोबाईल, 4 लॅपटॉप 49 एअरटेल सिम कार्ड,8 वोडाफोन सिम कार्ड, एक प्रिंटर असा 4 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे आणि त्यांच्या तपास पथकाने यशस्वीरित्या आरोपीला अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.