
मुंबई:प्रतिनिधी
रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत लेवल १ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेत तब्बल ३२००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यत आली आहे.
रेल्वेतील या नोकरीसाठी अर्ज २३ जानेवारी म्हणजेच उद्यापासून करु शकणार आहात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२५ आहे.
या नोकरीसाठी तुम्ही rrbahmedabad.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात
या भरती मोहिमेत ७ व्या वेतन आयोगाअंतर्गत मॅट्रिक्सनुसार ३२,४३८ पदांवर भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी १८ ते ३६ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
रेल्वेत ग्रुप डी पदांसाठी भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ५०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये भरायचे आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
या नोकरीसाठी तुम्ही rrbahmedabad.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. तेथील Recruitment सेक्शनवर क्लिक करा. त्यानंतर माहिती भरा आणि शुल्क भरा. या फॉर्मची प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.
या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २३ जानेवारी २०२५ पासून म्हणजे उद्यापासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२५ आहे.