
सांगली:प्रतिनिधी
मिरज येथे पोलिसांनी छापा टाकून मेफेन्टरमाइनचा मोठा साठा जप्त करून तिघांना अटक केली आहे. रोहित कागवाडे, ओंकार मुळे आणि आशपक पटवेगार अशी आरोपींची नावे आहेत.
महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मिरजेत नशेचे मेफेन्टरमाइन इंजेक्शनची विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी छापा टाकून संशयीतांना अटक केली होती. यावेळी नशेसाठी वापरण्यात येणारे मेफेन्टरमाइन इंजेक्शन त्यांच्याकडे आढळून आले. या कारवाईमध्ये एका मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात मेफेन्टरमाइनचा साठा तेथून तो पुरवठा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मिरजेतील संबंधित मेडिकलवर छापा टाकून तब्बल १४ लाखाचे १५०० इंजेक्शन आणि १७६ नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
दरम्यान कोणताही परवाना नसताना नशेसाठी वापरले जाणारे मेफेन्टरमाइन इंजेक्शनची (Mephentermine) विक्री करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. दरम्यान सर्व संशयीतांनी नशेचे इंजेक्शन कोठून आणले व त्याची कोणत्या ठिकाणी विक्री केली जात होती, याचा देखील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मेफेन्टरमाइन इंजेक्शनच्या तब्बल १५०७ बॉटल पोलिसांनी जप्त केल्या आहेत, १० मिलीच्या सर्व बॉटल आहेत. एकूण १४ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिरजमधील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. इंजेक्शनचा विक्री व साठा केल्याप्रकरणी आतापर्यंत ३ जणांना अटक केली आहे. आरोपीमधील एकाचे स्वतःचे मेडिकल आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याची पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे, रॅकेट पर्यत पोचण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
आरोपींची नावे
१) रोहित अशोक कागवाडे वय ४४ वर्षे रा. शामरावनगर, आकांशा मेडीकल वरील बाजुस, सांगली,
२) ओंकार रविंद्र मुळे वय २४ वर्षे रा. गव्हर्मेंट कॉलनी, विजय कॉलनी, विश्रामबाग सांगली व
३) आशपाक बशीर पटवेगार वय ५० वर्षे रा. असुबा हॉटेलसमोर, पत्रकारनगर सांगली या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे.