मुंबई प्रतिनिधी
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागून महिना उलटल्यानंतर अखेर सत्तास्थापनेचं चित्र स्पष्ट झालं आहे. बहुतांश महापालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौरांची निवड पूर्ण झाली असून, शहरी राजकारणावर भाजप आणि महायुतीचा ठसा अधिक गडद झाल्याचं दिसत आहे.
मुंबई
मुंबई महापालिकेत महायुतीने सत्ता मिळवली आहे. भाजपच्या रितू तावडे यांची महापौरपदी, तर शिंदेसेनेचे संजय घाडी यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे.
ठाणे
ठाणे महापालिकेतही महायुतीचा वरचष्मा कायम आहे. शिंदेसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर महापौर, तर भाजपचे कृष्णा पाटील उपमहापौर झाले आहेत.
कल्याण-डोंबिवली
येथे महायुतीने सत्ता स्थापन केली आहे. शिंदेसेनेच्या हर्षाली चौधरी महापौर, तर भाजपचे राहुल दामले उपमहापौर आहेत.
मिरा-भाईंदर
मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने स्वबळावर सत्ता मिळवली आहे. डिंपल मेहता महापौर, तर ध्रुवकिशोर पाटील उपमहापौर झाले आहेत.
वसई-विरार
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीने आपली सत्ता कायम राखली आहे. अजीव पाटील महापौर, तर मार्शल लोपिस उपमहापौर आहेत.
नवी मुंबई
नवी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता प्रस्थापित झाली आहे. सुजाता पाटील महापौर, तर दशरथ भगत उपमहापौर आहेत.
भिवंडी
भिवंडी महापालिकेत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी अद्याप सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे.
उल्हासनगर
उल्हासनगरमध्ये महायुतीची सत्ता आहे. शिंदेसेनेच्या अश्विनी निकम महापौर, तर भाजपचे अमर लुंड उपमहापौर आहेत.
पनवेल
पनवेल महापालिकेत भाजपने सत्ता मिळवली आहे. नितीन पाटील महापौर, तर प्रमिला पाटील उपमहापौर झाल्या आहेत.
पुणे
पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असून मंजुषा नागपुरे महापौर, तर परशुराम वाडेक उपमहापौर आहेत.
पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा विजय झाला आहे. रवी लांडगे महापौर, तर शर्मिला बाबर उपमहापौर आहेत.
नागपूर
नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. नीता ठाकरे महापौर, तर लीला हाथीबेड उपमहापौर आहेत.
नाशिक
नाशिकमध्ये महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. भाजपच्या हिमगौरी आडके महापौर, तर शिंदेसेनेचे विलास शिंदे उपमहापौर आहेत.
छत्रपती संभाजीनगर
येथे महायुतीने सत्ता मिळवली आहे. भाजपचे समीर राजूरकर महापौर, तर शिंदेसेनेचे राजेंद्र जंजाळ उपमहापौर आहेत.
नांदेड
नांदेड महापालिकेत भाजपची सत्ता आहे. कविता मुळे महापौर, तर दीपकसिंह रावत उपमहापौर आहेत.
अमरावती
अमरावतीत भाजपने सत्ता स्थापन केली असून श्रीचंद तेजवानी महापौर झाले आहेत.
परभणी
परभणीत शिवसेना (उबाठा) सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही.
मालेगाव
मालेगाव महापालिकेत इस्लाम पक्ष–सप आघाडीची सत्ता आहे. नसरीन बानो खालिद महापौर, तर शान-ए-हिंद उपमहापौर आहेत.
सोलापूर
सोलापूरमध्ये भाजपची सत्ता असून विनायक कोंड्याल महापौर झाले आहेत.
धुळे
धुळे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मायादेवी परदेशी महापौर, तर ज्योत्स्ना पाटील उपमहापौर आहेत.
सांगली
सांगलीत महायुतीने सत्ता मिळवली आहे. भाजपचे धीरज सूर्यवंशी महापौर, तर राष्ट्रवादी (अप)चे गजानन मगदूम उपमहापौर आहेत.
कोल्हापूर
कोल्हापुरात महायुतीची सत्ता आहे. भाजपच्या रुपाराणी निकम महापौर, तर जनसुराज्यचे अक्षय जिरग उपमहापौर आहेत.
इचलकरंजी
इचलकरंजी महापालिकेत भाजपची सत्ता असून उदय धातुंडे महापौर, तर अनिल कुमार उपमहापौर आहेत.
जळगाव
जळगावमध्ये महायुतीची सत्ता आहे. भाजपच्या दीपमाला काळे महापौर, तर शिंदेसेनेचे मनोज चौधरी उपमहापौर आहेत.
अहिल्यानगर
अहिल्यानगरमध्ये महायुतीने सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादी (अप)च्या ज्योती गाडे महापौर, तर भाजपचे धनंजय जाधव उपमहापौर आहेत.
अकोला
अकोल्यात भाजपची सत्ता असून शारदा खेडकर महापौर, तर अमोल गोगे उपमहापौर आहेत.
लातूर
लातूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. जयश्री सोनकांबळे महापौर, तर स्नेहल उटगे उपमहापौर आहेत.
जालना
जालन्यात भाजपची सत्ता असून वंदना मगरे महापौर, तर राजेश राऊत उपमहापौर आहेत.
चंद्रपूर
चंद्रपूर महापालिकेत भाजप–शिवसेना (उबाठा) युतीची सत्ता आहे. भाजपच्या संगीता खांडेकर महापौर, तर शिवसेना (उबाठा)चे प्रशांत दानव उपमहापौर आहेत.


