मुंबई प्रतिनिधी
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील निर्मलनगर पोलीस ठाणे आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या बीट क्रमांक १ (ए. के. मार्ग) तसेच बकुळ निवास चौकी येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून पोलीस दलाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

या कार्यक्रमास निर्मलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश वाघ उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक युराज खडे (गुन्हे), सुजित कांबळे (जनसंपर्क) तसेच सुरेखा गर्गे मॅडम यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश भोयर, राहुल बहुरे, दीपक खराडे, राजेंद्र धाबडे, पल्लवी तरले, पार्वती घाडगे, प्रतिभा शेते यांचीही उपस्थिती होती. तसेच पोलीस उपनिरीक्षक शैलेश चौधरी, रमेश करपे, सुदर्शन बनकर, विजय धास, शशांक परब, संदीप जरांदे, गणेश जगरवल, बी. जी. बंधू, संतोष कोळगे, सलीम शिक्कलगार, संग्राम पाटील, रमेश बहिरवाडे, हर्षद हिंगे, संतोष मासाळ, संकेत कांबळे, श्रीराम दाखवले, निलेश दंडाळे, शीतल पाटील, नीलम जाधव, सुप्रिया राठोड आदी अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात बीट ऑर्डरली, कमांडर व पोलीस सिपाई मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये एकनाथ गमने, देव गीते, भुवनेश बवर, सतीश गीते, सुनील शिंदे, दीपक खंडारे, मौला अली, सावंत, अमोल पवार, अजीम शेख, निशिकांत पाटील, किशिरे सोनावणे, प्रणये तायडे, दिगंबर वागमारे, निलेश खरे, सुरेंद्र पाटील, बालाजी एकरूप, अनिल कुंभार, दिलीप परब, प्रतीक जाधव, ऋषिकेश तारे, संजय प्रभू, शमशुदीन संदे यांच्यासह सर्व एएसआय सहभागी झाले होते.
या प्रसंगी स्थानिक नागरिक, समाजसेवक तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशाच्या एकात्मतेचा, संविधानाच्या मूल्यांचा आणि राष्ट्रसेवेचा संदेश देणारा हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पोलीस दल व नागरिक यांच्यातील सौहार्द अधिक दृढ झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले.


