•३१ आयएएस आणि १८ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश; केंद्रशासित प्रदेशांवर विशेष भर
नवी दिल्ली वृत्तसंस्था
केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करत ४९ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये ३१ आयएएस (IAS) आणि १८ आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दिल्लीसह विविध केंद्रशासित प्रदेशांतील प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने हे फेरबदल करण्यात आल्याचे गृह मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्रशासित प्रदेशांमधील प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती थेट गृह मंत्रालयाकडून केली जाते. त्यामुळे या बदल्यांचे आदेशही गृह मंत्रालयाकडूनच काढण्यात आले आहेत. दिल्ली, जम्मू-काश्मीर, लडाख, अंदमान-निकोबार, पुद्दुचेरी, गोवा, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, चंदीगड, लक्षद्वीप, दमण-दीव आणि दादरा नगर हवेली या भागांतील अधिकाऱ्यांचा या फेरबदलात समावेश आहे.
आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (अनुक्रमांकासह)
अश्वनी कुमार (१९९२) – जम्मू आणि लडाख
संजीव खिरवार (१९९४) – दिल्ली
संतोष डी. वैद्य (१९९८) – दिल्ली
पद्मा जयस्वाल (२००३) – दिल्ली
शूरबीर सिंग (२००४) – लडाख
आर. एलिस वाझ (२००५) – जम्मू आणि काश्मीर
यशपाल गर्ग (२००८) – दिल्ली
संजीव आहुजा (२००८) – दिल्ली
नीरज कुमार (२०१०) – दिल्ली
सय्यद आबिद रशीद शाह (२०१२) – चंदीगड
सत्येंद्र सिंग दुर्सावत (२०१२) – दिल्ली
अमन गुप्ता (२०१३) – दिल्ली
राहुल सिंग (२०१३) – दिल्ली
अंजली सेहरावत (२०१३) – जम्मू आणि काश्मीर
हेमंत कुमार (२०१३) – अंदमान आणि निकोबार
रवी दादरीच (२०१४) – मिझोरम
किन्नी सिंग (२०१४) – पुद्दुचेरी
सागर डी. दत्तात्रय (२०१४) – जम्मू आणि काश्मीर
अरुण शर्मा (२०१५) – दिल्ली
वंदना राव (२०१५) – अंदमान आणि निकोबार
बसीर-उल-हक चौधरी (२०१५) – लडाख
मायकेल एम. डिसूझा (२०१५) – गोवा
आकृती सागर (२०१६) – जम्मू आणि काश्मीर
कुमार अभिषेक (२०१६) – जम्मू आणि काश्मीर
सलोनी राय (२०१६) – दिल्ली
निखिल यू. देसाई (२०१६) – गोवा
अंकिता मिश्रा (२०१८) – अरुणाचल प्रदेश
हरी कल्लीकट (२०१८) – दिल्ली
विशाखा यादव (२०२०) – दिल्ली
अझरुद्दीन झहीरुद्दीन काझी (२०२०) – दिल्ली
चीमाला शिव गोपाल रेड्डी (२०२०) – दिल्ली
आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (अनुक्रमांकासह)
अजित कुमार सिंगला (२००४) – दिल्ली
मंगेश कश्यप (२००९) – अरुणाचल प्रदेश
राजीव रंजन सिंग (२०१०) – चंदीगड
प्रशांत प्रिया गौतम (२०१३) – जम्मू आणि काश्मीर
आर. पी. मीना (२०१३) – दिल्ली
राहुल अलवाल (२०१४) – दिल्ली
एस. एम. प्रभुदेसाई (२०१४) – गोवा
राजिंदर कुमार गुप्ता (२०१४) – पुद्दुचेरी
शोभित डी. सक्सेना (२०१५) – दिल्ली
संध्या स्वामी (२०१६) – अरुणाचल प्रदेश
सचिन कुमार सिंघल (२०१७) – दिल्ली
अक्षत कौशल (२०१८) – अरुणाचल प्रदेश
श्रुती अरोरा (२०१८) – गोवा
अचिन गर्ग (२०१९) – अरुणाचल प्रदेश
सनी गुप्ता (२०२०) – जम्मू आणि काश्मीर
ईशा सिंग (२०२१) – दिल्ली
प्रशासन अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न
विशेषतः दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रशासन आणि कायदा-सुव्यवस्थेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे फेरबदल महत्त्वाचे मानले जात आहेत. आगामी काळात विकासकामे, सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासकीय समन्वय अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने या बदल्यांकडे पाहिले जात आहे.


