
सातारा प्रतिनिधी
सातारा युनिव्हर्सल नॉलेज स्कूलमध्ये 20 जानेवारी रोजी ‘अंतरिक्ष बस’ अवतरणार असून सातारा शहरातील सर्व शाळांनी ही अंतरिक्ष बस पाहात ज्ञानार्जन करावे, असे आवाहन युनिव्हर्सल नॉलेज स्कूलचे चेअरमन नितीन माने यांनी केले आहे.
आपल्यापेक्षा लक्षावधी किमी दूर असणारे सुर्य, चंद्र, ग्रह,असंख्य तारे एकूणच अंतराळाचे सर्वांनाच कुतूहल असते. याच अंतराळ प्रवासाची परिपूर्ण माहिती व्हावी, या उद्देशाने ‘भारतीय अंतराळ संस्था’ अर्थात इस्त्रोने ‘स्पेस ऑन व्हील’ म्हणजेच ‘अंतराळ बस’ ही अनोखी संकल्पना साकारली असून या फिरत्या बसमध्ये चंद्रयान मोहीम,मंगलयान मोहीम, अवकाशात सोडलेले विविध उपग्रह तसेच इस्त्रोचा एकूणच प्रवास विद्यार्थ्यांना पहायला मिळणार आहे.
या बसचे 15 ऑगस्ट रोजी नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर, हैदराबादचे संचालक जी.श्रीनिवास राव यांच्या उपस्थितीत या बसचे उद्घाटन झाले. बसचा प्रवास प्रत्येेक जिल्ह्यात किमान पंधरा दिवसांचा आहे. विदर्भातील प्रवास पूर्ण करत दि. 20 जानेवारी 2025 रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील युनिव्हर्सल नॉलेज स्कूल,वर्ये,सातारा येथे येत आहे.
.20 जानेवारी 2025 या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत पाहावयास उपलब्ध असेल. अंतराळ दर्शनासह विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषेचे आयोजन केले आहे. या बसच्या माध्यमातून अंतराळाची सफर विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे. या सुवर्णसंधीचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन शाळेचे चेअरमन नितीन माने, उपप्राचार्या रोशनी चंदनखेडे,शिक्षक शिक्षिका यांनी केले आहे.