मुंबई प्रतिनिधी
डिसेंबर महिना सुरू होताच सण-उत्सवांची रेलचेल वाढत जाते. यंदाही विविध राज्यांत १७ दिवस बँका बंद राहणार असल्याने नागरिकांच्या दिनचर्येतील बँकिंग व्यवहारांवर परिणाम होणार आहे. खाते उघडणे, चेक क्लीअरन्स, पासबुक अपडेट किंवा कर्ज प्रक्रियेची पूर्तता अशा कामांसाठी जाणाऱ्या ग्राहकांनी याची विशेष नोंद घेणे आवश्यक आहे.
तथापि, यूपीआय, नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंग या डिजिटल सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. मात्र, सुट्टींच्या पार्श्वभूमीवर रोख रकमेची तरतूद आणि महत्त्वाची कामे आधीच उरकणे हितावह ठरणार आहे.
डिसेंबरमधील सुट्ट्यांची राज्यनिहाय यादी पुढीलप्रमाणे
१ डिसेंबर (सोमवार) – अरुणाचल प्रदेश
‘इंडिजिनस फेथ डे’ निमित्त राज्यातील बँका बंद.
३ डिसेंबर (बुधवार) – गोवा
सेंट फ्रान्सिस झेविअर पर्व.
१२ डिसेंबर (शुक्रवार) – मेघालय
‘पा तोगन नेंगमिंजा संगमा दिवस’.
१८ डिसेंबर (गुरुवार) – छत्तीसगड, मेघालय
गुरु घासीदास जयंती व यू सोसो थम पुण्यतिथी.
१९ डिसेंबर (शुक्रवार) – गोवा
गोवा मुक्ती दिन.
२४ डिसेंबर (बुधवार) – मेघालय, मिजोरम
ख्रिसमस ईव्ह.
२५ डिसेंबर (गुरुवार) – सर्व राज्ये
ख्रिसमस; देशभरात बँका बंद.
२६ डिसेंबर (शुक्रवार)
मेघालय, मिजोरम व तेलंगणा – ख्रिसमस सेलिब्रेशन
हरियाणा – शहीद उधम सिंह जयंती.
२७ डिसेंबर (शनिवार)
हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश – गुरु गोबिंद सिंह जयंती.
३० डिसेंबर (मंगळवार)
मेघालय – यू कियांग नांगबाह दिवस
सिक्किम – तामु लोसर.
३१ डिसेंबर (बुधवार)
मिजोरम, मणिपूर – नववर्ष स्वागत.
डिसेंबर महिन्यात येणाऱ्या या सलग सुट्ट्यांच्या तडाख्यात सामान्य व्यवहार अडथळ्यांची शक्यता असल्याने नागरिकांनी आर्थिक नियोजनाचा धांडोळा आधीच घेणे गरजेचे आहे.


