
पुणे (विभागीय प्रतिनिधी सुनील कलशेट्टी
पुणे (दि.०३जानेवारी)- पुणे जिल्ह्यातील नारायणगाव इथल्या वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या शिक्षक दाम्पत्यांन डिंभा डाव्या कालव्यात उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीय.
कौटुंबिक तणावातून वाळू वाडी (ता. जुन्नर जि.पुणे) येथील डिंभा डाव्या कालव्यात उडी मारून आत्महत्या केलेल्या शिक्षकी पेशातील उच्च विद्या विभूषित, गणित प्राध्यापक व लेखक कलावंत कवी चिराग चंद्रशेखर शेळके (वय २८) व त्यांच्या पत्नी प्राध्यापक पल्लवी चिराग शेळके (वय २४) या शिक्षक दांपत्याचे मृतदेह. स्थानिक तरुणांच्या मदतीने शोध घेण्यात नारायणगाव पोलिसांना यश आलं आहे.
चिराग शेळके यांनी नारायणगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गणित विषयाच्या अध्यापनाचे काम केले होते. तर त्यांच्या पत्नी प्राध्यापक पल्लवी या पुणे येथील एका नावाजलेल्या महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. चिराग व प्राध्यापक पल्लवी हे वारूळवाडी (तालुका जुन्नर) येथील अभंग वस्तीत आपल्या आईस राहिला होते.
बुधवारी (दिनांक ०१) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास दोघेही दुचाकीवरून वारुळवाडी रस्त्यावरील डिंभे डावा कालव्यावरील पुलावर आले होते. त्याने दुचाकी पुलारू उभी केली. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर दोघांनीही कालव्यात उडी मारल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी पाहिले.
शिक्षक दाम्पत्याने कालव्यात उडी मारल्याची माहिती वारूळ वाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर यांनी पोलीस पाटील सुशांत भुजबळ व नारायण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना दिली. चिराग शेळके यांचा मृत्यू देह बुधवार रात्री शोधण्यात यश आले. मात्र अंधार पडल्याने प्रा. पल्लवी यांचा शोध घेता आला नाही. गुरुवार (दिनांक ०२) सकाळी ९ सुमारास प्राध्यापक पल्लवी यांचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आला. दुपारी दोघांच्या मृतदेहाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीप्ती कळबकर यांच्या उपस्थितीत येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आणि सायंकाळी ४ चार वाजता त्यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे वारूळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.