
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर कायम असून येत्या रविवारी (ता. २८ सप्टेंबर) मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. या भागांत दिवसभरात विजांचा कडकडाट, वाऱ्यांच्या जोरदार झोतांसह अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Thunderstorm accompanied with lightning, heavy to very heavy rain with gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of Konkan- Goa Marathwada and Ghats area of Madhya-Maharashtra .
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 27, 2025
याशिवाय नाशिक व पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील भागातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी होत असल्याने नद्या, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे नवीन पावसाचा फटका बसल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची भीती हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
महापालिकेचे आवाहन
मुंबई महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी, रेल्वे उशीर तसेच काही ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे.
🌧️हवामान खात्याने मुंबई महानगरात आज मुसळधार (Orange Alert) तर, रविवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी अतिमुसळधार पावसाचा (Red Alert) अंदाज वर्तवला आहे. 🚨
🌧️सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहे.
🙏नागरिकांनी… pic.twitter.com/pc6ghy0zIo
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 27, 2025
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी १९१६ या महापालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत असून पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
संभाव्य परिणाम
• किनारपट्टी भागात भरतीच्या वेळी समुद्रात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता
• लो-लाईंग भागात पाणी साचण्याचा धोका
• उपनगरी रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता
• वीज कोसळण्याचा धोका असल्याने मोकळ्या जागेत थांबणे टाळावे
प्रशासन सज्ज
राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून संबंधित जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफची पथके तैनात ठेवण्यात आली असून धोकादायक झोपडपट्ट्यांमधून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे.