
मुंबई प्रतिनिधी
महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली… pic.twitter.com/oRnOcQxuzP
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 11, 2025
या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात. आतापर्यंत कोट्यवधी महिलांना सलग १३ महिने हप्त्याचा लाभ मिळाला आहे. मात्र ऑगस्टचा हप्ता उशिराने मिळाल्याने महिला प्रतिक्षेत होत्या.
तटकरेंनी एका पोस्टमधून स्पष्ट केले की, ‘‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती आहे. पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. लवकरच सर्व आधार संलग्नित खात्यांमध्ये निधी जमा होईल.’’
दरम्यान, या योजनेत महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात. तर पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभार्थी शेतकरी महिलांना दरमहा ५०० रुपयांचा लाभ मिळतो.