
पुणे (विभगीय प्रतिनिधी सुनील कलशेट्टी
अक्षय जावळकर हा मुख्य आरोपी हा सतीश आणि मोहिनी वाघ यांच्या मुलाचा मित्र वाघ यांच्याकडे अक्षय चे कुटुंब भाड्याने राहिला होते. यादरम्यान वाघ आणि जवळकर यांच्यात कौटुंबिक संबंध निर्माण झाले. त्यावेळीच अक्षय आणि मोहिनी यांच्या जवळीक वाढू लागली. दोघांचे अनैतिक संबंधाची कुणकुण सतीश वाघ यांना लागले. त्यावरून एक दोनदा त्यांनी मोहिनी यांना ठोकले अक्षय हा मोहिनी वाघ पेक्षा दहा वर्षे लहान आहे. दोघांचे संबंध सतीश वाघ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकारावरून दोन ते तीन वेळा मोहिनी वाघ यांना मारहाण केली होती.
नवऱ्याला प्रकरण कळाल्याचे समजताच मोहिमेने अक्षयला सांगून खोली बदलण्यास भाग पाडले अक्षयच्या कुटुंबाने २०१६ साली सतीश वाघ यांची भाड्याची खोली सोडली. मात्र खोली सोडल्यानंतर येतो मोहिनीच्या संपर्कात होता. वरचेवर दोघे भेटायचे देखील. मात्र दरम्यानच्या काळात विविध कारणावरून सतीश वाघ हे सातत्याने दारू पिऊन मोहिनीला मारण करू लागले.
आपल्या प्रेमात नवऱ्याचा अडसर येतोय या प्रमुख कारणांसह इतरही कारणामुळे मोहिनी त्रस्त होती. मागील सहा महिन्यापासून मोहिनी ही सतीश वाघ यांना संपवण्यासाठी प्लॅन करत होती.आपल्या परिचयातील एका व्यक्तीला सतीशला संपण्यासाठी विचारण्यात देखील केली होती .तिने अक्षयच्या साथीने पतीच्या हत्येची सुपारी दिली
पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. सतीश यांची पत्नी मोहिनी वाघ हिचे या हत्याकांडातील मुख्य आरोपी अक्षय जवळकर यांच्याशी अनैतिक संबंध होते. हे समजल्यानंतर सतीश वाघ यांच्याकडून वहिनी वाघ यांना मारहाण केली जात होती, तसेच घरातील सर्व आर्थिक व्यवहार आपल्याकडे हवेत यासाठी मोहिनीचा आग्रह होता. त्याचबरोबर सतीश हा मोहिनी आणि अक्षय यांच्या संबंधात अडथळा ठरत होता.
भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात त्याच्या बायकोनेच सुपारी दिल्याचा खळबळजनक खुलासा झाला. स्वतःच्या मुलाच्या मित्रासोबतच मोहिनी वाघ यांचे प्रेम संबंध असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. गेल्या आठ ते दहा वर्षापासून मोहिनी आणि अक्षय चे प्रेम संबंध असल्याचे बोलले जाते. आपल्या प्रेमात नवऱ्याचा अडसर येतो या प्रमुख कारणासह इतरही कारणामुळे मोहिनी त्रस्त होती अखेर अक्षय आणि मोहिनीने ठरवून सतीश वाघ यांचा काटा काढण्याचे ठरवले. अखेर अक्षय आणि महिने प्लॅन करून सतीश वाघ यांना संपवले. पाच लाखाची सुपारी अक्षयने मारेकर्यांना दिली. त्यानुसार सुपारी देऊन सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर वाघ यांच्या अंगावर तब्बल ७२ चाकूचे वार केले मारेकरी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी सतीश वाघ यांचे गुप्तांग देखील कापले त्यांच्यावर करण्यात आले.
पुण्यातील सतीश वाघ यांची हत्या त्यांच्याच पत्नी मोहिनी वाघ यांनी सुपारी देऊन केला असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोहिनी वाघला (बुधवारी) अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या संदर्भात पुराव्याच्या आधारे मोहिनी वाकडे सखोल चौकशी केली असता तिने या घटनेची कबुली दिली. सतीश वाघ यांच्याकडून होणारी मारहाण, आर्थिक व्यवहार हातात यावेत तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय जावळकर यांच्याशी असलेले संबंध यातून ही हत्या करण्यात आली आहे.
सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी देऊन खून करण्याच्या प्रकारात त्यांचा बायकोचा सहभाग असल्याने हळहळ व्यक्त होतोय. नात्याला काळीमा फासणाऱ्या या प्रकारानंतर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय.