
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई | वडाळा टीटी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तब्बल ५१ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त करत दोन सराईतांना अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत तब्बल १० लाख ३० हजार रुपयांहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई शुक्रवारी (२२ ऑगस्ट) दुपारी करण्यात आली. पोलिस गस्त घालत असताना पांढऱ्या रंगाच्या वॅगनआर कार (क्र. MH 01 EE 3013) वर संशय आल्याने गाडी थांबविण्यात आली. चालक पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी शिताफीने कार अडवली व झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणात गांजा सापडला.
या प्रकरणी अबुबकर मेहंदीहसन शान आणि शहबाज शमीम खान या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना २५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईचे मार्गदर्शन पोलिस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर आयुक्त विक्रम देशमाने, परिमंडळ-४ चे पोलिस उपायुक्त श्रीमती रागसुधा आर. यांनी केले. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे व पोलीस निरीक्षक अनुराधा भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई पार पाडली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक किरण नवले, माधवेंद्र येवले, पो. ह. धनंजय जाधव, अजुमुद्दीन मिर, संपत गोसावी, रविंद्र ठाकुर, रमेश कुटे, पो. शि. बापु पाटोळे, राजू शिंदे, रणजित चौधरी, आनंद भोसले, विजय हनुमंते, नबीलाल बोरगावकर, शफीक शेख, रमेश बोरसे आदींचा समावेश होता.
या कारवाईमुळे वडाळा परिसरातील गांजा विक्री करणाऱ्या रॅकेटला मोठा धक्का बसला असल्याचे पोलिसांनी सांगितले.