
मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या अंबरनाथ शहरात गुन्ह्यांच प्रमाण वाढलं आहे कधी काय होईल याचा नेम नाही. सामान्य माणसाने जगायचं कसं असा प्रश्न सध्या सर्वांना वाढत्या गुन्ह्यांमुळे पडला आहे. त्यात आता घरात घुसून एका महिलेला आणि तिच्या दोन मुलांनाही काही जणांनी मारहाण केल्याचं प्रकरण उघडकीस आलंय.
भाडेकरार संपल्यावर घर सोडण्यास सांगितल्यानं भाडेकरूने घर मालकिणीच्या बहिणीवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबरनाथमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मारहाण, विनयभंग आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र यावरून त्यांच्यात वाद होऊन झटापटी झाली. त्यानंतर काही वेळाने मॉन्टी हे काही लोकांना घेऊन पुन्हा उर्मिला यांच्या घरी गेले आणि तिथे उर्मिला यांच्यासह त्यांच्या दोन लहान मुलांनाही मारहाण केली. तसेच घरातील सामानाची तोडफोड करत महापुरुषांच्या फोटोंचीही विटंबना केली.
या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेलेल्या उर्मिला यांची पोलिसांनी तीन दिवस तक्रार न घेता त्यांना चकरा मारायला लावल्या, असा उर्मिला यांचा आरोप आहे. अखेर बुद्धिस्ट फोरमच्या सदस्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला.