
पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्रातील शेतकरी आणि जमिनीचे मालक असलेल्या नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि क्रांतिकारी बातमी समोर आली आहे. भूमी अभिलेख विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे 7/12 उतारा, 8 अ, फेरफार नोंदी यांसारखी अत्यावश्यक कागदपत्रे आता थेट व्हॉट्सअॅपवर मिळणार आहेत.
१५ जुलैपासून प्रायोगिक, तर १ ऑगस्टपासून राज्यभर अंमलबजावणी
ही सुविधा १५ जुलै २०२५ पासून प्रायोगिक तत्त्वावर, आणि १ ऑगस्ट २०२५ पासून संपूर्ण राज्यभरात लागू करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सेतू केंद्रांमध्ये तासनतास रांगा लावण्याची गरज राहणार नाही. सरकारी कामासाठी दलालांचा आधारही संपणार आहे.
अशी घ्या सेवा…
https://bhumiabhilekh.mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा
मोबाईल नंबर नोंदवा व OTP पडताळा
एकदाच ५० रुपयांचे नोंदणी शुल्क भरावे लागेल
नोंदणी झाल्यानंतर फक्त १५ रुपयांत विविध सेवा मिळणार
ही सेवा फक्त जमिनीचे मालक असलेल्या नागरिकांसाठी उपलब्ध
या सुविधा मिळणार…
सातबारा, ८ अ, फेरफार नोंदी, ई-रेकॉर्ड्स – डिजिटल आणि प्रमाणित स्वरूपात
जमिनीशी संबंधित कायदे, प्रक्रिया, हक्क यावर प्रश्नोत्तर स्वरूपात मार्गदर्शन
जमिनीच्या नोंदींमध्ये बदल झाला की तत्काळ सूचना थेट व्हॉट्सअॅपवर
कोणतीही कागदपत्रे डाऊनलोड करण्याची सोपी आणि सुरक्षित प्रक्रिया
या बदलांमुळे होणारे ५ महत्त्वाचे फायदे :
दलालांची गरज नाही – सेवा थेट शासकीय प्लॅटफॉर्मवरून
शेतकऱ्यांना घरबसल्या सेवा – वेळ, पैसा आणि श्रमांची बचत
डिजिटल प्रमाणित दस्तावेज – सुरक्षितता आणि पारदर्शकता
फसवणुकीला आळा – तत्काळ सूचना आणि नोंदींची शुद्धता
कामात गती – सरकारी कामांसाठी धावपळीची गरज उरणार नाही
महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय राज्यातील डिजिटल भूमी व्यवस्थापनाच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. शेतकऱ्यांचे सशक्तीकरण, प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.