
मुंबई प्रतिनिधी
मालवणी पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करत दोन संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे २३.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही इसमांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संध्याकाळी मालाड मार्वे रोडवरील साईबाबा मंदिराजवळ करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक डॉ. दिपक हिंडे आणि त्यांच्या निगराणी पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, एका निळ्या रंगाच्या बलोनो कारमध्ये काही संशयित इसम मोठ्या प्रमाणावर बनावट भारतीय चलन बाळगून आहेत
पोलिसांनी तत्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि कारमधून दोन इसमांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून ५०० रुपयांच्या एकूण १,७४० बनावट नोटा, नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर, लॅपटॉप, कलर इंक, कागद, कटर, कात्री, स्केल आणि इतर साहित्य तसेच गुन्ह्यात वापरलेली कार आणि मोबाईल जप्त करण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे :
१) संपत सामवय्या एंजपल्ली (वय ४६), रा. गांधीनगर, ता. घनपूर, जि. जयशंकर (भुपालंपली), तेलंगणा.
२) रहीमपाशा याकुब शेख (वय ३०), रा. घनपूर, ता. घनपूर, जि. वारंगळ, तेलंगणा.
मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईचे श्रेय अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) शशीकुमार मिना, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ११) आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त निता पाडवी आणि मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत पथकाला जाते.
ही कारवाई डॉ. दिपक हिंडे (पोलीस उपनिरीक्षक) व त्यांच्या सहकाऱ्यांनी – पो.ह. अनिल पाटील, पो.ह. जगदीश घोसाळकर, पो.शि. सुंशात पाटील, पो.शि. सचिन वळतकर, पो.शि. मुददसिर देसाई, पो.शि. समित सोरटे, पो.शि. कालीदास खुडे आदिनी सहकार्याने केले.