
मुंबई प्रतिनिधी
सध्या डिजीटल युगात काही सेकंदात जगाशी केक्ट होता त्याच बरोबर WhatsApp चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. प्रत्येकाच्या मोबाईलमधले हे महत्वाचे मानले जाणारे अॅप आहे. मात्र अलिकडे WhatsApp च्या नव्या स्कॅमच्या घटना वाढत चालल्या आहेत.
यामध्ये WhatsApp नंबरवर काही फोटो किंवा गाणी डाऊनलोड करायला सांगितली जातात. असे केल्यास त्वरित तुमच्या खात्यातले पैसे तुमच्या नकळत काढले जातात. चला जाणून घेऊया या स्कॅमची संपुर्ण माहिती आणि त्यावरील उपाय.
भारतातील ५० कोटींहून अधिक WhatsApp युजर्स आहेत. WhatsApp हे लोकांना जोडण्याचे साधन आहे. मात्र स्कॅमर्ससाठी ते मोठे शस्त्र बनले आहे. यामध्ये हॅकर्स तुमच्या इमेज फाइल्सच्या माध्यमातून तुमची पर्सनल माहिती घेतात. त्यावरूनच तुमचे बॅंकेतले पैसे चोरले जातात. यामध्ये ‘स्टेगनोग्राफी’ नावाचे तंत्र वापरले जात आहे. त्यामध्ये आपल्या मोबाईलमधला सगळा डाटा सेव्ह केला जातो. तसेच असलेला व्हायरस फोनमध्ये टाकताच अँक्टिव्ह होतो. मुख्य: jpg किंवा .png यांसारख्या इमेजमध्ये हा डेटा लपवला जातो आणि फोनमध्ये घेतला जातो.
फसवणूक कशा पद्धतीने केली जाते?
WhatsApp वर तुम्ही युजर्स इमेज फाइल्स डाउनलोड करताना हा व्हायरस सक्रीय केला जातो. त्याने तुमचा पासवर्ड आणि तुम्हाला आलेला OTP सुद्धा इंटरसेप्ट करता येऊ शकतो. हा व्हायरस सामान्य फिशिंग लिंक्सच्या माध्यमातून शोधता येत येत नाही. त्यामुळे तो अधिक धोकादायक ठरू शकतो.
स्कॅमपासून वाचण्यासाठी उपाय
1. सर्वप्रथम तुमच्या WhatsApp मधून ऑटो डाउनलोड बंद करून घ्या.
२. WhatsApp मधील सेटींगमधील ऑटोमॅटिक मीडिया डाउनलोड बंद करून घ्या.
३. अनोळखी नंबरवरून काही व्हि़डीओ किंवा इमेज आल्यास उघडू नका.
४. अनोळखी नंबर वाटत असल्यास लगेचच ब्लॉक करा.
५. WhatsApp प्रायव्हसीमध्ये जाऊन ग्रुर इनव्हाईट्स ‘ माय कॉन्टॅक्ट्स’वर लिमिट करा.
६. कोणालाही OTP शेअर करू नका.