
मुंबई प्रतिनिधी
कॅबिनेट मंत्री आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर करण्यात आलेले आरोप संबंधित महिलेने मागे घेतले आहेत. हे माझे वैयक्तिक प्रकरण असून त्यावर कुणीही राजकारण करू नये असं सांगत त्या विवाहित महिलेने आरोप मागे घेतले आहेत.
दोन दिवसापासून या महिलेने माझ्यावर अन्याय अत्याचार झाला असे आरोप केले असताना आज या महिलेने आता हे प्रकरण घरगुती असून चे वैयक्तिक प्रकरण आहे त्यामुळे कुणी राजकारण करू नये असं म्हटलं आहे.
त्यामुळे या प्रकरणामध्ये आता नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळालं.
या महिलने आरोप मागे घेताना हे आपलं घरघुती प्रकरण असल्याचं स्पष्ट केलं. या प्रकरणी विरोधी पक्षांनी राजकारण करू नये असंही ती महिला म्हणाली. ती महिला म्हणाली की, संजय शिरसाट यांचा मी सन्मान करते. सिद्धांत शिरसाट यांच्यावर केलेले मी आरोप मागे घेते. हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणावरुन कुणीही राजकारण करू नये. या प्रकरणाला मी फुल स्टॉप देत आहे. माझ्या खांद्यावर बंदुक ठेऊन कुणीही राजकारण करू नये.
सोशल मीडियावर किंवा माझ्या नावाने कोणीही राजकारण केलं तर मी कायदेशीर कारवाई करणार असा इशारा या महिलेने केला. मी शिरसाट साहेबांचा सन्मान करतेय. त्यांनी मला कधीही त्रास दिला नाही. त्यांनी कधीही फोन केला नाही असं ती महिला म्हणाली. हे प्रकरण मला संपवायचं आहे, मला यात गुंतून न पडता पुढे जायचं आहे असं ती महिला म्हणाली.
सिद्धार्थ शिरसाटांवर या विवाहित महिलेकडून मानसिक, शारीरिक छळ, फसवणूक तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. 2018 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सिंद्धांत आणि या महिलेची ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये वारंवार शारीरिक संबंध निर्माण झाले. चेम्बूर येथील फ्लॅटवर वारंवार दोघांमध्ये भेटी होत असत. 14 जानेवारी 2022 रोजी या सिद्धांत आणि आपला बौद्ध पद्धतीने लग्न झाल्याचा दावा या महिलेने केला होता. तसेच त्याचे पुरावे असल्याचा दावाही तिने केला होता.
लग्नानंतर सिद्धार्थच्या स्वभावात बदल झाला सिद्धार्थकडून नंतर या महिलेचा जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याची माहिती या महिलेने दिली होती. या महिलेला चेम्बूरच्या फ्लॅटमध्ये राहण्याची जबरदस्ती केली आणि संभाजीनगरात येण्यास मज्जाव करण्यात आला.
सिद्धार्थचे आधीचे विवाह संबंध, इतर महिलांसोबतचे संबंध उघडकीस आल्यानंतर 20 डिसेंबर 2024 रोजी शाहूनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पण संजय शिरसाट यांनी राजकीय वजन वापरून हे प्रकरण दाबलं असल्याचा आरोप या महिलेने केला होता.