
पुणे प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मांजरेवाडी या गावात धक्कादायक घटना घडली आहे. येथे 12 वी मध्ये शिकणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. नराधमाने अल्पवयीन मुलीला शेतात नेत तिच्यावरती दोन वेळा लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
या घटनेनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.
या घटनेबाबत माहिती देताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, खेड तालुक्यातील घटनेसारख्या घटना घडू नयेत म्हणून सोमवार पासून शाळेतील मुलीसोबत संभाषण करण्याच्या सूचना बिट मार्शल दामिनी पथकाला दिल्याची माहिती दिली आहे. खेड तालुक्यात घडलेल्या घटनेशी संबंधित आरोपीला अटक केली आहे.
रूपाली चाकणकरांचं आवाहन…
आरोपीचे चार्जसीट तात्काळ दाखल करून गुन्हा फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. समाजात अश्या नराधमांना जागा नाही. ही एक विकृती आहे. आरोपी व्यक्ती ही ओळखीची व्यक्ती आहे आणि समाजामध्ये 90 टक्के अत्याचार हे ओळखीच्या लोकांकडूनच होत आहेत. त्यामुळे ओळखीच्या लोकांवर सुद्धा विश्वास ठेवू नये असं आवाहन रूपाली चाकणकरांनी यावेळी केलं.