
वार्ताहर -स्वप्नील गाडे
माजी आमदार तृप्ती बाळा सावंत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात मंगळवार २९अक्टोबर२०२४रोजी सकाळी राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षात प्रवेश केला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी वांद्रे पूर्व विधानसभेच्या उमेदवार म्हणून माजी आमदार तृप्ती बाळा सावंत यांना AB फॉर्म देऊन त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे.तृप्ती सावंत ह्या दुपारी २वाजल्याच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षा कडून अधिकृत उमेदवारी अर्ज म.न.से सैनिकांच्या उपस्थितीत दाखल करणार आहे.
माजी कार्यसम्राट आमदार तृप्ती बाळा सावंत यांनी मनसेत प्रवेश केला असून. तृप्ती सावंत या वांद्रे पूर्व विधानसभेतून निवडणूक लढवणार आहेत.वांद्रे पूर्व विधानसभेत तृप्ती बाळा सावंत यांनी व त्यांचे पती कार्यसम्राट आमदार स्व.प्रकाश(बाळा)सावंत हे गेले ३५वर्षे वांद्रे पूर्व विधानसभेत लोकप्रतिनिधी म्हणून.जनतेची सेवा करत आले आहेत सावंत कुटुंबाचा या विभागात जनसंपर्क जास्तप्रमानात असल्या मुळे या २०२४च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवार तृप्ती बाळा सावंत यांना या विभागातून जनतेच्या मतांच्या आशीर्वादाने बहुमताने विजयी होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही