
मुंबई प्रतिनिधी
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड पश्चिम, रामबाग लेन ॲडव्हान्स पलाझो बिल्डिंगमध्ये मध्यरात्री स्पायडरमॅनप्रमाणे इमारतीवर चढून चोरी करणाऱ्या चोरट्याला मालाड पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.
मालाड पोलिसांनी चोराकडून 36 लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि हिरे जप्त केले आहे.
मालाड पोलिसांनी सापळा रचून जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या रुळांवर फिल्मी शैलीत १ किलोमीटर धावून आरोपीला अटक केली. संतोष सुरेश चौधरी उर्फ वैतू (23) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात 30 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून आरोपीने अजून कुठे चोरी किंवा इतर कोणता गुन्हा केला आहे का याचा तपास घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 10 एप्रिल रोजी मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रामबाग लेन ॲडव्हान्स पलाझो बिल्डिंगमध्ये मध्यरात्री स्पायडरमॅनप्रमाणे इमारतीवर चढून घरफोडी झाल्याची घटना घडली होती याप्रकरणी फिर्यादी यांनी मालाड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दिली. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून मालाड पोलिसांनी तात्काळ घरफोडीचा गुन्हा नोंद करून तपासाची सुरुवात केली.
मालाड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षातील तपास अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, तांत्रिक विश्लेषण आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या मदतीने आरोपीच्या चेहऱ्याची ओळख पटवली. यानंतर खबऱ्याच्या मदतीने आरोपीची माहिती घेतली असता आरोपी जोगेश्वरी रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे रुळालगत असलेल्या झोपडपट्टीमध्ये राहत असल्याची समजले.
माहितीची खातरजमा करून मालाड पोलिसांनी सापळा रचून जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या रुळांवर फिल्मी शैलीत १ किलोमीटर धावून आरोपीला अटक केली. संतोष सुरेश चौधरी उर्फ वैतू (23) असे अटक आरोपीचे नाव आहे. जो अंधेरी पश्चिम येथील रहिवासी आहे. आरोपींकडून 36 लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि हिरे जप्त करण्यात आले आहेत.
मालाड पोलिसांच्या तपासात आरोपींवर ३० हून अधिक चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. चोरटे काही मिनिटांत चोरी करून पळून जायचे. मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आत्तापर्यंत सर्व चोरीच्या घटना आरोपींनी कुठे केल्या आहेत व या चोरीच्या घटनेत आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास मालाड पोलीस करत आहेत.