
सातारा प्रतिनिधी
कायम दुष्काळी शिक्का असलेल्या माण तालुक्यात पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणीच येऊ शकत नाही म्हणणा-या प्रस्तापित तत्कालीन लोकप्रतिनिधी ना माणचे आमदार व राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी चपराक दिली असून तालुक्यातील बहुतांशी पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. तालुक्यातील पाण्याच्या योजना या अंतिम टप्प्यात आहेत.
तालुक्यातील बारमाही कोरडी समजली जाणारी माणगंगा नदी ऐन उन्हाळ्यात खळखळून वाहताना दिसत आहे हे पाण्याचे चित्र पाहून शेतक-यांच्या व नागरिकांच्या चेह-यावरील आनंद द्विगुणित झाला आहे.
कायम दुष्काळी समजला जाणारा माण तालुक्यात आज ऐन उन्हाळ्यात ही पाणी दिसुन येते ही किमया आहे. राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांची गोरे ज्या भागाचे नेतृत्व करतात तो माण तालुक्यात पाणीच येऊ शकत नाही म्हणणा-या प्रस्थापित नेत्यांना जनतेचा लोकप्रतिनिधी काय आसतो याचा प्रत्यय दिला आहे.
मंत्री गोरे यांच्या प्रयत्नातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून माणसह खटाव या दुष्काळी समजल्या जाणाऱ्या तालुक्यात उरमोडी, जिहे कटापूर, टेंबु योजनेच्या माध्यमातून तालुक्यात आज पाणी आल्याची वस्तुस्थिती विरोधकही नाकारू शकत नाहीत. माणच्या दक्षिण भागात पाणी आले आहे तर उत्तर भागातील पाण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे सध्या उन्हाळा सुरू आहे. पूर्वी उन्हाळा सुरू झाला की जनतेच्या अंगावर काटा येत असे. कारण पिण्याच्या पाण्याची चिंता फार असायची. पण आता ही चिंता ही नामदार गोरे यांनी बहुतांशी मिटवली आहे. कारण सध्या जिहे कटापूर योजनेचे आवर्तन सुरू आहे. या योजनेचे पाणी आंधळी धरणात सोडून ते पुढे माणगंगा नदीत सोडले आहे. हे पाणी आज तालुक्यातील शेवटच्या भागातील म्हसवडला पोहचले आहे.
सध्या या पाण्याने म्हसवडला पर्यायी पिण्याच्या पाण्याची योजना असलेल्या शेंबडे वस्तीच्या बंधा-यात पोहचले असुन या बंधा-यातील पाण्यामुळे म्हसवड शहर व बारा खेडी बारा वाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐन उन्हाळ्यात मिटल्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू
आमच्या आतापर्यंत च्या आयुष्यात माणगंगा नदीला उन्हाळ्यात कधीच पाहिले नव्हते पण आज आमचे नेते मंत्री मंत्री जयकुमार गोरे यांनी ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व शेती पाण्याची समस्या जाणून नदीला पाणी सोडल्यामुळे मनापासून आनंद झाला. ऐन उन्हाळ्यात माणगंगा नदी खळखळून वाहताना बघुन आमच्या डोळ्यात आनंदाश्रू येताहेत असे नागरिक सांगतायेत.