
मुंबई प्रतिनिधी
नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रियाज हुसेन अब्दुल कुरेशी ४४, यांची धारदार शस्त्राने हत्या केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर इसमाच्या हत्याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाच्या तपासामध्ये आरोपी मोहम्मद वसिम,अक्रम शेख राठी, आणि साजीद अली, आशिकअली चौधरी, यांना नागपाडा येथून अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांचा साथीदार इमरान साबीर शेख हा पळून गेला होता. त्याचा शोध सुरू होता.मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मेहसाना, सिधपूर, गुजरात येथून आरोपीस शिताफीने अटक केली.
पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), गुन्हे शाखा, मुंबई दत्ता नलावडे, सहा. पोलीस आयुक्त, डी (विशेष), गुन्हे शाखा, मुंबई किशोर कुमार शिंदे, प्रभारी पोलीस निरीक्षक सुधीर जाधव (खंडणी विरोधी कक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. रामदास कदम, पो.उ.नि. शिरसाट (कक्ष-३), पो.ह. सांगोळे आणि पो.ह. कांबळे यांनी आरोपीला पकडण्यात परिश्रम घेतले.