
सातारा प्रतिनिधि न्युज नेटवर्क.
जम्मू-काश्मीर मध्ये उमर अब्दुल्लाचे सरकार बनताच दहशतवादयानी केला गोळीबार
प्रसारमाध्यमांच्या माहिती नुसार बिहार येथील अशोक चोहान यांची जम्मू-काश्मीर प्रदेशात शोपियान जिल्ह्यात दहशतवादयानी शुक्रवारी १८अक्टोबर २०२४ रोजी गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली.
त्यावेळी अशोकवर गोळीबार केल्याने मृतदेह जैनपोरा येथील वंदुना गावात अस्ताव्यस्त सापडला. प्रशासनाने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
अनंतनाग येथे राहणारा अशोक चौहान हे शोपियान येथे मका कापण्याचे काम करायचा. त्याच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे, सकाळी अशोकचा फोन आला की आम्ही वेळ दवडण्यासाठी फिरायचो. मात्र बराच वेळ होऊन गेला मात्र अशोक पुन्हा आला नाही. त्यावेळी त्याच्या मित्रांनी त्याचा शोध सुरू केला आहे. काही वेळाने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
अलीकडे जम्मू-काश्मीर येथे स्थलांतरित मजुरांना लक्ष्य करण्यात आले आहे. मात्र या प्रकरणात जम्मू-काश्मीर प्रशासन काय भूमिका बजावेल याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.