
पत्रकार:उमेश गायगवळे
बोरिवली पश्चिम येथील वजीर नाका येथील परिसरात एका इमारती त बेकायदेशीर कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली या कॉल सेंटर मधून अरविंद अमेरिकन नागरिकांशी त्यांच्या संगणकातील तांत्रिक समस्या सोडवण्याच्या पाहण्याने संपर्क साधून त्यांची मायक्रोसॉफ्टचे प्रतिनिधी असल्याचा खोटा दावा करून नंतर पिढीताकडून बँक खात्याची माहिती मिळवून त्यांची मोठी आर्थिक फसवणूक केली होती.
या गंभीर घटनेनंतर परिमंडळ गुन्हे शाखा युनिट 12 च्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून चार आरोपींना अटक केली.कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी सहा लॅपटॉप 20 मोबाईल फोन दोन रायटर सहा हेडफोन आणि 2.41 लाख रुपयांचे साहित्य जप्त केले आरोपींवर विविध कलम लावली असून माहिती तंत्रज्ञान कायदा आणि टेलिग्राम कायद्याच्या संबंधित कलमाखाली आरोप ठेवण्यात आले असून आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर आणि पोलीस आयुक्त राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन गावस, पोलीस निरीक्षक बाळासाहेब राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रासकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती निलोफर शेख, अधिकारी उपनिरीक्षक लक्ष्मण बागवे, उपनिरीक्षक अल्ताफ खान, पोलीस अधिकारी कल्पेश सावंत, पोलीस अधिकारी लिम्हन, पोलीस अधिकारी चव्हाण, पोलीस अधिकारी शैलेश बिचकर, श्री विशाल गोमे, पोलीस अधिकारी प्रसाद गोरुले पोलीस अधिकारी शैलेश सोनवणे, पोलीस हवालदार श्री अरुण धोत्रे, आणि पोलीस हवालदार चंद्रकांत शिरसाट आदीनी ही कारवाई उत्कृष्टरित्या पार पाडली.