पुणे महानगरपालिका अमृत महोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट.
सातारा प्रतिनिधि
February 16, 2025

पुणे(विभागीय प्रतिनिधी, सुनील कलशेट्टी
पुणे: महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त महानगरपालिकेच्या प्रांगणात दि.१५ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार सुनील तटकरे, आमदार विजय शिवतरे, आमदार चेतन तुपे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष मा श्री दीपक मानकर, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड चे संचालक तथा पुणे पर्वती विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा श्री संतोष नांगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी विविध मान्यवर तसेच पुणे महानगरपालिकेतील अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.