
पुणे (विभागीय प्रतिनिधी सुनील कलशेट्टी
पुणे (दि.१० फेब्रुवारी २०२५)–स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीमध्ये सॅलेसबरी पार्क पुणे, येथे एका चार चाकी इसमास दोन इसमाने अडवून त्याच्याबरोबर वाद करून त्याच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून घेतली .म्हणून स्वारगेट पोलीस ठाणे गु.र.नं ४२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४),३५१(३) १२६(२),३(५) प्रमाणे गुन्हा दाखल असून गुन्ह्यात अज्ञात आरोपी व चोरीस गेला मुद्देमाल यांच्या शोध घेणे कामी श्री संतोष तानवडे, पोलीस उपनिरीक्षक स्वारगेट पोलीस ठाणे पो.अं. हनुमंत दुधे असे मा. वरिष्ठ,पो.अं. सुजय पवार, पो.अं. संदीप घुले, पो.अं. दीपक खेदाड, पो.अं. फिरोज शेख, पो.अं. शैलेश वाघमोडे, असे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस ठाणे यांच्या मुफजंल आदेशाने स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीत रवान झालो. असताना पो.अं. सुजय पवार यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे डायस प्लॉट चौक गोल टेकडी पुणे येथे थांबले आहेत.
अशी माहिती मिळाली असता आम्ही लागलीच सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता.दोन संशयित इसम आम्हास पाहून पळून जाऊ लागले असता त्यांना सदर पोलीस स्टाफचे मदतीने ताब्यात घेऊन त्यांना असे अचानक आम्हास पाहून पळून जाण्या मागचे विचारता त्याने उडवाउडची उत्तरे दिल्याने त्यांना त्यांचे नाव पत्ते विचारता त्याने त्यांचे नाव व पत्ते १) रोहित सूर्यकांत कांबळे वय २१ वर्ष गल्ली नं ०१ औद्योगिक वसाहत ,व्हेईकल डेपो पुणे
२) सागर शिवानंद जळकुंटे वय वर्ष २४ रा.गल्ली नं १ औद्योगिक वसाहत, व्हेईकल डेपो पुणे असे असल्याचे सांगितले त्यावेळी त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, दिनांक ०६/०२/२०२५ रोजी सायंकाळी ०५.३० वा .चे सुमारास श्री सुविधा दर्शन बंगल्याजवळ, सॅलेसबरी पार्क समोर पुणे येथे आमच्या गाडीच्या अपघातावरून एका चारच्या की चालकाशी वाद झाला व आम्ही त्याच्या गळ्यातील चैन हिसकावून घेऊन आलो आहे असे सांगितले व सदर इसम दाखल गुन्ह्यातील आरोपी असल्याची निष्पन्न झाल्याने त्यांच्याकडून दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमाल व गुन्ह्यात वापरले दुचाकी असा एकूण १,००,००,०००/-रुपये किमतीचा मुद्देमाल पंचनामाने जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा श्री. अमितेश कुमार सो. पोलीस आयुक्त पुणे शहर, मा श्री रंजनकुमार शर्मा सो. पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा श्री प्रवीण कुमार पाटील सो. पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री विवेक मासाळ सो. अतिरिक्त कारभार पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०२, पुणे शहर, मा.श्री.राहुल खिलारे सो. अतिरिक्त कारभार मा. श्री. राहुल आवारे सो. सहाय्यक पोलीस उपयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली मा श्री युवराज नांद्रे सो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री राहुल कोलंबीकर सो सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री संतोष तानवडे, पोलीस उपनिरीक्षक, श्री रवींद्र कस्पटे सो. पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार नितीन वाघेला, पो.अं. सुजय पवार, पो.अं. संदीप घुले, पो.अं. दीपक खेदाड, पो.अं. फिरोज शेख, पो.अं. शैलेश वाघमोडे, पो.अं. हनुमंत दुधे यांचे पथकाने केलेली आहे.